डी कंपनीशी संबंधित सात आरोपींना पोलीस कोठडी, मुंबई सत्र न्यायालयाचा आदेश

विशेष न्यायालयाने पाच आरोपींना 18 ऑक्टोंबरपर्यंत तर पूर्वी अटक केलेल्या दोन आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला आहे.

डी कंपनीशी संबंधित सात आरोपींना पोलीस कोठडी, मुंबई सत्र न्यायालयाचा आदेश
तरुणीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 5:26 PM

ब्रिजभान जैस्वार, TV9 मराठी, मुंबई : डी कंपनीसोबत संबंध प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात आरोपींना (Seven Accused in Connection with D Company) मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) पोलीस कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि खंडणीविरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंधित पाच जणांना अटक केली आहे. एका हॉटेल व्यवसायिकाला धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी यापूर्वी दोन आरोपींना अटक केली गेली होती. आज एकूण सात आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात (Macoca Court) हजर करण्यात आला.

विशेष न्यायालयाने पाच आरोपींना 18 ऑक्टोंबरपर्यंत तर पूर्वी अटक केलेल्या दोन आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला आहे.

चौकशीसाठी आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी

एकूण सात आरोपींना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. मात्र रिमांडसाठी युक्तिवाद करताना या सर्व आरोपींकडून खंडणी वसुली प्रकरण आणि डी कंपनीसोबत लिंक असल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून विशेष न्यायालयात केली गेली होती.

हे सुद्धा वाचा

सलीम फ्रुटला विनाकारण अडकवल्याचा वकिलांचा दावा

आरोपीच्या वकिलांकडून असा युक्तिवाद करण्यात आला की, यात पूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात छोटा शकिलचा मेव्हणा सलीम फ्रुटला विनाकारण अनेक प्रकरणात अडकवण्यात येत आहे.

तसेच दुसरा आरोपी रियाज भाटी याला यापूर्वी अटक केली असल्याने त्याच्याकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

विशेष न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना 18 ऑक्टोबरपर्यंत तर यापूर्वी अटक करण्यात आलेले दोन आरोपी सलीम फ्रुट आणि रियाज भाटी यांना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला.

भाटी आणि फ्रूटच्या अटकेनंतर पाच जणांवर कारवाई

मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंधित पाच जणांना अटक केली. व्यावसायिकाकडून वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. रियाज भाटी आणि सलीम फ्रूटला अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

डी कंपनीचे मुंबईतील सदस्य पोलिसांच्या रडारवर

मागील काही दिवसांपासून दाऊद टोळीतील मुंबईतले सदस्य पोलिसांच्या रडारवर होते. त्यात अजय गोसारिया, फिरोज चमडा, समीर खान, अमजद रेडकर आणि यासह आणखी एका आणखी आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात पुढील तपासात आणखी काही महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.