संतापजनक ! नवी मुंबईत सात वर्षाच्या चिमुकलीवर घराशेजारच्या नराधमाकडून बलात्कार

नवी मुंबईतील वाशी येथील एका 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे (Seven-year-old girl raped by neighbor in Navi Mumbai).

संतापजनक ! नवी मुंबईत सात वर्षाच्या चिमुकलीवर घराशेजारच्या नराधमाकडून बलात्कार
सूरत बलात्कार व हत्या प्रकरण: आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 3:44 PM

मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथील एका 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने हा विकृतपणा केला आहे. मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेच्या आईला बाहेर नेले. त्यानंतर तो घरी आला आणि पीडितेसोबत किळसवाणं कृत्य केलं. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Seven-year-old girl raped by neighbor in Navi Mumbai).

पीडिता इयत्ता दुसरीची विद्यार्थींनी

वाशी सेक्टर 9 येथे राहणाऱ्या 7 वर्षीय मुलीसोबत हे कृत्य घडले आहे. पीडित मुलगी दुसरीत शिकत आहे. तिची घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन नव्हता. यामुळे तिच्या आईने शेजारीच राहणाऱ्या कुटुंबाकडे मदत मागितली होती. त्यानुसार शेजारचे दांपत्य त्या महिलेला घेऊन मोबाईलच्या दुकानात गेले होते. त्याठिकाणी लोनवर मोबाईल मिळवून देतो असे त्याने महिलेला सांगितले (Seven-year-old girl raped by neighbor in Navi Mumbai).

आरोपीने पोटच्या मुलीला घराबाहेर काढले, नंतर चिमुकलीवर अत्याचार

यादरम्यान महिलेची मुलगी आणि आरोपीची मुलगी दोघे घरी होते. आरोपीने दुकानमधून मोबाईल घेतला आणि घरी चेक करण्यासाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने तो परत घरी आला. यादरम्यान त्याने आपल्या लहान मुलीला बाहेर काढले आणि शेजारच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो परत मोबाईल घेऊन दुकानात गेला. त्यानंतर मोबाईल घेऊन सर्वजण घरी आले.

पीडितेने आईला सांगितल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

संबंधित प्रकार घडल्यानंतर मुलीची आई घरी आल्यानंतर मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली. पण या प्रकरणामुळे भयभीत झालेल्या कुटुंबाने तक्रार देण्याचे टाळले. मात्र त्या घटनेनंतर मुलीला त्रास होऊ लागला. त्यामुळे संबंधित कुटुंबाने मंगळवारी (7 जुलै) वाशी पोलीसांकडे तक्रार केली.

आरोपीला बेड्या, 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

संबंधित घटना गंभीर असून पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी अर्जुन इचकेला अटक केली. आरोपीला वाशी कोर्टात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्याला 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

महिलेवर गँगरेप करुन व्हिडीओ शूट, 11 अवैध बांगलादेशींसह बारा जण अटकेत, 1,019 पानी आरोपपत्र

आधी पोलिसांना म्हणाला तुला मधून चिरतो, पोलीस स्टेशनात नेताच ढसाढसा रडत माफी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.