Mangesh Kudalkar : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या, कारण अस्पष्ट; पोलीस तपास सुरु
आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. रजनी कुडाळकर असे त्यांचे नाव असून कुर्ला नेहरु नगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली.
मुंबई : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांची पत्नीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रजनी कुडाळकर (Rajani Kudalkar) असे त्यांचे नाव असून कुर्ला नेहरु नगर येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे. रजनी कुडाळकर यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळतेय. (Shiv Sena MLA Mangesh Kudalkar’s wife commits suicide by strangulation)
मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. कुडाळकर हे कुटुंबासह कुर्ल्यातील नेहरु नगर परिसरात वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रजनी यांनी राहत्या घरात गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रजनी यांचा मृतदेह ताब्यात घेत घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. रजनी यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मुलाच्या मृत्यूनंतर खचल्या होत्या रजनी
रजनी यांच्या मुलाचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे त्या खचल्याचं बोललं जातंय. दरम्यान, रजनी कुडाळकर यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच मंगेश कुडाळकर यांच्या समर्थक घटनास्थळी पोहोचत आहेत. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही मंगेळ कुडाळकर यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली आणि त्यांचं सांत्वन केल्याची माहिती मिळत आहे. (Shiv Sena MLA Mangesh Kudalkar’s wife commits suicide by strangulation)
The body of Shiv Sena MLA Mangesh Kudalkar’s wife Rajani was found hanging at her residence. Senior police officials present at the spot: Mumbai Police
— ANI (@ANI) April 17, 2022
इतर बातम्या
Ulhasnagar Crime : आक्षेपार्ह फोटो असल्याच्या संशयातून डॉक्टरने सुपारी देऊन नर्सचा मोबाईल चोरला
Pune Crime : पुण्यात हृदयाचा ठोका चुकवणारी घटना, तीन वर्षाच्या चिमुकलीची पित्याकडून निर्घृण हत्या