आरोपीचा खाजगी व्हिडिओ व्हायरल, मग मित्रांमध्ये तुफान राडा; ‘असा’ झाला अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी उघड्या खिडक्या, दरवाज्यांच्या फटी किंवा छताला असलेल्या छिद्रातून महिलांचे फोटो काढले आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केले.

आरोपीचा खाजगी व्हिडिओ व्हायरल, मग मित्रांमध्ये तुफान राडा; 'असा' झाला अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
ठेकेदाराचे अपहरण करत खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 12:54 AM

मुंबई : मोबाईलवर महिलांचे नग्न आणि अर्धनग्न व्हिडिओ (Nude Video) शूट केल्याप्रकरणी शिवडी पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. सतीश धनवेद हरिजन, सर्वानन तंगराज हरिजन आणि स्टीफन राज मुर्गेश नाडा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. व्हिडिओची तपासणी केल्यानंतर पोलिसांना संशय आहे की, आरोपींनी खिडक्या आणि दरवाजांमध्ये फट पाडून व्हिडिओ शूट केला आहे. शिवडी पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप जप्त (Seized) केले आहेत. या घटनेत अन्य आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

महिलांचे अश्लील व्हिडिओ शूट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींनी 2019 आणि 2020 मध्ये त्यांच्या भागातील अनेक महिलांचे नग्न आणि अर्धनग्न व्हिडिओ शूट केले होते. मित्रांच्या एका गटात 28 ऑगस्ट रोजी झालेल्या भांडणानंतर ही घटना उघडकीस आली आणि या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. हे तरुण पीडित महिलांच्या घरांमध्ये छिद्र पाडून त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी उघड्या खिडक्या, दरवाज्यांच्या फटी किंवा छताला असलेल्या छिद्रातून महिलांचे फोटो काढले आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केले. याशिवाय आरोपींनी महिलांचे अंघोळ करताना आणि कपडे बदलतानाचेही व्हिडिओ रेकॉर्ड केले.

हे सुद्धा वाचा

असा झाला पर्दाफाश

या प्रकरणात आतापर्यंत तीन ते चार पीडित महिला पुढे आल्या आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.आरोपींपैकी एका आरोपीचाही खाजगी व्हिडिओ परिसरातील इतर कोणीतरी रेकॉर्ड केला होता. परिणामी त्यांच्यात बाचाबाची झाली, तेव्हा लोकांना आरोपींच्या कृत्याबद्दल माहिती झाली आणि त्यांनी 28 ऑगस्ट रोजी पोलिसांकडे धाव घेतली.

परंतु कोणीही तक्रार देण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि काही महिलांनी पुढे येऊन आरोपींविरुद्ध जबाब नोंदवल्यावर गुरुवारी आयटी कायद्यासह आयपीसीच्या कलम 354 सी, 292 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....