Bombay High Court : बारबालांवर पैशांचा वर्षाव करणे हे अश्लील कृत्य; मुंबई पोलिसांचा हायकोर्टात दावा

2016 मध्ये ताडदेव पोलिसांनी गिरगाव परिसरातील ड्रमबीट बारवर छापा टाकला होता. बारमालक, रोखपाल, वेटर, कर्मचारी, 10 महिला नृत्यांगना आणि ग्राहकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी 20 रुपयांच्या 40 नोटा जप्त केल्या होत्या.

Bombay High Court : बारबालांवर पैशांचा वर्षाव करणे हे अश्लील कृत्य; मुंबई पोलिसांचा हायकोर्टात दावा
मुंबई उच्च न्यायालयImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 2:28 AM

मुंबई : बारबालांवर पैशांचा वर्षाव करणे हा अश्लील कृत्या (Obscene Act)चा गुन्हा आहे, असा दावा मुंबई पोलिसांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court)त केला आहे. मुंबईतील एका बारमध्ये पोलिसांच्या छाप्यादरम्यान सुरतमधील दोन व्यायसायिकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी (Hearing) झाली. यावेळी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या दोन्ही आरोपींना कनिष्ठ न्यायालयासमोर हजर राहण्यापासून सूट देत त्यांना अंतरिम दिलासा दिला. यावेळी मुंबई पोलिसांनी कारवाईचे समर्थन करताना बारमधील बारबालांवर पैशांचा वर्षाव करणे हे अश्लील कृत्य असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने त्याची दखल घेत सुनावणी तहकूब केली आहे.

व्यावसायिक बारमध्ये केवळ बसून दारू पीत होते-बचाव पक्ष

उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान व्यावसायिकांच्या वतीने अधिवक्ता मतीन शेख आणि अन्सार तांबोळी यांनी बाजू मांडली. याचिकाकर्ते व्यावसायिक बारमध्ये केवळ बसून दारू पीत होते, असे वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी, “तुम्ही तिथे का गेलात? वेगवेगळ्या प्रकारचे बार आहेत.”, अशी विचारणा याचिकाकर्त्या व्यावसायिकांना केली. त्यावर महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार रूममध्ये अश्लील नृत्य प्रतिबंध आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण 2016 अंतर्गत तरतुदीनुसार याचिकाकर्त्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाऊ शकत नाही. कारण दोघेही केवळ ग्राहक आहेत. ते बारचे मालक किंवा कामगार नाहीत, असे शेख आन तांबोळी यांनी न्यायालयाला सांगितले.

बारमध्ये परफॉर्मन्स करणाऱ्यांवर कारवाई व्हायला नको का- हायकोर्ट

यावेळी मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अरफान सैत यांनी बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, ही 2016 ची घटना आहे. जेव्हा एक फसवणूक करणारा ग्राहक बारमध्ये गेला होता आणि त्याने 15 ग्राहकांना कलाकारांवर पैशांचा वर्षाव करताना पाहिले होते. अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी दोन्ही व्यावसायिकांना अटक करण्यात आली, असे सैत यांनी सांगितले. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती नाईक यांनी, जे लोक परफॉर्मन्स करीत होते, त्यांच्यावर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी कारवाई व्हायला नको का?, असा सवाल केला. त्यावर आरोपी हे बारमध्ये बसून पैशांचा वर्षाव करीत होते. बारमध्ये परफॉर्मन्स करणाऱ्या महिलांवर पैशांचा वर्षाव करणे हे एक अश्लील कृत्य आहे, असे मुंबई पोलिसांच्या वतीने सैत यांनी स्पष्ट केले. त्यांनी आरोपींविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ मागितला. आरोप निश्चित करण्यासाठी आरोपींना दंडाधिकारी न्यायालयात हजर राहावे लागणार होते. तथापि, न्यायालयाने त्यांना हजर राहण्यापासून सूट दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत आरोपींवर आरोप निश्चित केले जाणार नाहीत.

हे सुद्धा वाचा

नेमके प्रकरण काय आहे?

2016 मध्ये ताडदेव पोलिसांनी गिरगाव परिसरातील ड्रमबीट बारवर छापा टाकला होता. बारमालक, रोखपाल, वेटर, कर्मचारी, 10 महिला नृत्यांगना आणि ग्राहकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी 20 रुपयांच्या 40 नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 294 (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार रूममध्ये अश्लील नृत्य करण्यास मनाई आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण (त्यामध्ये काम करणे) 2016 चे काही कलम याअंतर्गत गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात आरोपींनी 21 नोव्हेंबर 2019 रोजी फौजदारी दंड संहितेच्या कलम 239 अन्वये दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. दंडाधिकारी न्यायालयाने तसेच सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. त्यानंतर आरोपींनी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Showering money on barbala is an obscene act, claims Mumbai Police in High Court)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.