Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांशी मुंबई पोलिसांचं अनोखं नातं; आठवड्यातून दोनवेळा करणार विचारपूस

अलीकडे महिलांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. या निर्णयानुसार स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि बिट मार्शल यांना आठवड्यातून दोनवेळा ज्येष्ठ नागरीकांच्या घरी जाणे बंधनकारक असणार आहे.

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांशी मुंबई पोलिसांचं अनोखं नातं; आठवड्यातून दोनवेळा करणार विचारपूस
ज्येष्ठ नागरिकांशी मुंबई पोलिसांचं अनोखं नातं
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 10:41 PM

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अलीकडच्या काळात सायबर गुन्हे वाढले आहेत. यातील सायबर गुन्हेगार अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे वाढत्या गुन्हेगारीतून उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसां (Mumbai Police)नी ज्येष्ठ नागरिकां (Senior Citizen)च्या सुरक्षेसाठी विशेष पाऊल उचलले आहे. हा नवा उपक्रम मुंबई पोलीस आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात अनोखे नाते अधिक घट्ट करणार आहे. कारण यापुढे मुंबई पोलीस आपल्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरी आठवड्यातून दोनवेळा जाऊन त्यांची विचारपूस करणार आहेत. पोलिसांच्या या कौतुकास्पद पुढाकाराने एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. (Special operation of Mumbai Police for the safety of senior citizens)

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घ्या; पोलीस आयुक्तांचे आदेश

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवे पाऊल उचलतानाच यासंबंधी नियमांची सर्व पोलीस ठाण्यात काटेकोर अंमलबजावणी व्हावी, या अनुषंगाने मुंबई पोलीस आयुक्तांनी स्पष्ट आदेशच जारी केले आहेत. आठवड्यातून दोन वेळा ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जा आणि त्यांची विचारपूस करा. ज्येष्ठांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागतेय, ते जाणून घ्या आणि आव्यश्यक ती पुढची पावले उचला, असे आदेश पोलीस आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसोबत होणारे सायबर फ्रॉड, फसवणूक, डिलिव्हरी बॉयकडून होणारा त्रास, घरातील लोकांकडून होणारा छळ अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मुंबई पोलिसांकडून ज्येष्ठांना मदत केली जाणार आहे.

ज्येष्ठांच्या तक्रारींचा वरिष्ठ अधिकारी घेणार आढावा

ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणींची प्रत्येक पोलीस ठाण्याच्या डायरीमध्ये नोंद केली जाणार आहे. ज्येष्ठांची कुठलीही तक्रार असेल, तर त्यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्याने विशिष्ट कालावधीत काय कार्यवाही केली आहे, त्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या तक्रारींचा वेळीच निपटारा करणे शक्य होणार आहे. वरिष्ठ अधिकारी जातीनिशी लक्ष घालणार असल्यामुळे या कर्तव्यात कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांकडून हयगयीचा प्रश्न येणार नाही, असे मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

अलीकडे महिलांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. या निर्णयानुसार स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि बिट मार्शल यांना आठवड्यातून दोनवेळा ज्येष्ठ नागरीकांच्या घरी जाणे बंधनकारक असणार आहे. महिला सुरक्षेबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस ही विशेष खबरदारी घेणार आहेत. (Special operation of Mumbai Police for the safety of senior citizens)

इतर बातम्या

पोलिसांचा मोठा निर्णय, पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आता पोलीस ठाण्यात यायची गरज नाही, मुंबई पोलीस आयुक्त म्हणतात रिपोर्ट करा

रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी फडणवीसांना नोटीस; चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.