सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आईच्या तक्रारीवरुन आरोपी अटक
ठाणे येथे 2013 मध्ये तिची आरोपीशी भेट झाली. त्यानंतर 2014 मध्ये तिने आरोपीसोबत दुसरे लग्न केले. आरोपी व्यवसायाने ड्रायव्हर आहे.
मुंबई : अल्पवयीन सावत्र मुलीचे लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मुलुंड येथे एका 50 वर्षीय आरोपीला अटक (Arrest) केली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला मुलीशी गैरवर्तन करताना रंगेहाथ पकडल्यानंतर महिलेने पोलिसांना माहिती दिली. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपीने याआधीही मुलीशी गैरवर्तन (Misbehaviour) करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा महिलेने त्याला कडक शब्दात सुनावले होते.
पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर महिला ठाण्यात आली
महिलेचा पहिल्या पतीपासून 15 वर्षे, 12 वर्षे आणि 9 वर्षे वयाच्या तीन मुली आहेत. मुलगा नसल्याने 2011 मध्ये तिचे पहिले लग्न मोडले. त्यानंतर महिला आपल्या तीन मुलींसह ठाण्यात रहायला गेली.
ठाण्यात आरोपी भेट झाली आणि लग्न केले
ठाणे येथे 2013 मध्ये तिची आरोपीशी भेट झाली. या भेटीते प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर 2014 मध्ये तिने आरोपीसोबत दुसरे लग्न केले. आरोपी व्यवसायाने ड्रायव्हर आहे. लग्नानंतर तीन मुलींसह महिला आरोपीच्या मुलुंड येथील घरी रहायला गेली.
याआधीही आरोपीने गैरवर्तन करण्याचा केला होता प्रयत्न
याआधी 2020 मध्ये त्याने मोठ्या मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिलेने तेव्हा त्याला समज देत पुन्हा असे वर्तन न करण्यासाठी बजावले होते.
आरोपीची कारागृहात रवानगी
गेल्या आठवड्यात शुक्रवारी आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिला आणि पीडित मुलीच्या जबानीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.