पतीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, महिलेने जे केले ते पाहून पोलिसही थक्क झाले
मीनलच्या पतीचे मयत मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. मीनलने मुलीला पतीपासून दूर राहण्याबाबत अनेक वेळा समज दिली.
मुंबई : पतीचे दुसऱ्या तरुणीसह अनैतिक संबंध असल्याच्या संशयातातून (Suspicion on Immoral Relation) एका महिलेने बहिण आणि मैत्रिणीच्या मदतीने किशोरवयीन मुलीला संपवल्याची घटना कुर्ला (Kurla Mumbai) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी तिघी आरोपी महिलांना अटक (Three Lady Accused Arrested) केली आहे. मीनल पवार, शिल्पा आणि प्रज्ञा भालेराव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत.
मयत मुलीचे पतीशी अनैतिक संबंध असल्याचा संशयातून कृत्य
मीनल पवार ही या हत्याकांडातील मास्टरमाईंड आहे. मीनलच्या पतीचे मयत मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. मीनलने मुलीला पतीपासून दूर राहण्याबाबत अनेक वेळा समज दिली. मात्र मुलगी ही तरीही मीनलच्या पतीला भेटत होती. यामुळे मीनलचा ,ंताप झाला.
बहिण आणि मैत्रिणीच्या मदतीने हत्या
मीनल, तिची बहिण शिल्पा आणि मैत्रिण प्रज्ञा भालेराव या तिघीही बुधवारी दुपारी मुलीला भेटल्या. तिघींनीही मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीने त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तिघींनी तिची हत्या केली.
हत्येनंतर मृतदेह नाल्यात फेकला
हत्या केल्यानंतर मुलीचा मृतदेह प्लॅस्टिक बॅगेत भरुन गटारात फेकून दिला. पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन गटारातून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिघींवर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.