चोरी करायला गेला आणि तिथेच झोपला, चोप देऊन उठवला, पोलिसात नेताच भलतंच घडलं

नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये सराईत गुन्हेगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिनेश चव्हाण असं मृत आरोपीचे नाव असून घरफोडी, चोरीचे 7 गुन्हे त्याच्यावर पोलीस ठाण्यात दाखल होते.

चोरी करायला गेला आणि तिथेच झोपला, चोप देऊन उठवला, पोलिसात नेताच भलतंच घडलं
Koparkhairane Police Station
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 11:09 AM

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये सराईत गुन्हेगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिनेश चव्हाण असं मृत आरोपीचे नाव असून घरफोडी, चोरीचे 7 गुन्हे त्याच्यावर पोलीस ठाण्यात दाखल होते.

चोरीसाठी घरात घुसला आणि तिथेच झोपला

चोरीसाठी घरात घुसलेला चोरटा त्याच ठिकाणी झोपी गेल्याने हाती लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. यावेळी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू घटनास्थळी झालेल्या मारहाणीत झाला की पोलिसांच्या मारहाणीत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकले नसल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

दिनेश देवराज चव्हाण असे मृत पावलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तो कोपरखैरणे सेक्टर-5 परिसरात राहणारा आहे. त्याच्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत.

घरातील व्यक्तींनी दिला चोप

शुक्रवारी मध्यरात्री तो कोपरखैरणे सेक्टर 19 येथील एका घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता. घराची खिडकी उघडून तो आतमध्ये शिरल्यानंतर घरातच एका कोपऱ्यात झोपला. मात्र पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घरातील व्यक्तींना जाग आली असता त्यांना खिडकी उघडी दिसली. यामुळे त्यांनी घरात पाहिले असता एका कोपऱ्यात दिनेश झोपलेल्या अवस्थेत दिसला. यामुळे घरातील व्यक्तींनी त्याला चोप देऊन चोर पकडल्याची माहिती कोपरखैरने पोलिसांना दिली.

मृत्यू कसा झाला यावर प्रश्नचिन्ह

त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसवले होते. मात्र काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने वाशीच्या पालिका रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. त्याचा मृत्यू घटनास्थळी झालेल्या मारहाणीत झाला की पोलिसांच्या मारहाणीत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त आणि सीआयडीचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या दीड कोटींचं लाच प्रकरण, तपासात उकललं विवाहबाह्य संबंधातून झालेल्या एका हत्येचं गूढ

VIDEO: कामावर जाणाऱ्या तरुणीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न, वसईत सतर्क नागरिकांकडून आरोपींना बेदम चोप

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.