जुन्या भांडणाचा राग, अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरुणाची हत्या, पाच आरोपींना काही तासातच अटक

भाविक शिंदे आपल्या काही मित्रांसोबत शिव मंदिर परिसरात बसलेला असताना तिथे आलेल्या काही जणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन भाविकला मारहाण केली होती. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली होती.

जुन्या भांडणाचा राग, अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरुणाची हत्या, पाच आरोपींना काही तासातच अटक
मयत भाविक शिंदे
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 8:20 AM

अंबरनाथ : अंबरनाथममधील तरुणाच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला. पोलिसांनी काल दुपारपर्यंत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. 21 वर्षीय भाविक शिंदेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री घडली होती. (Thane Ambernath 21 years old Bhavik Shinde Murder five accuse arrested)

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ पूर्वे भागातील शिव मंदिर परिसरातील शाळेजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली होती. भाविक शिंदे हा उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील ब्राम्हणपाडा भागात राहणारा होता. भाविक शिंदे आपल्या काही मित्रांसोबत शिव मंदिर परिसरात बसलेला असताना तिथे आलेल्या काही जणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन भाविकला मारहाण केली होती. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली होती.

मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भाविकचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यानंतर हत्येच्या तपासादरम्यान अवघ्या काही तासातच पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या. तर या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास अटक केली.

हत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध

यापैकी चौघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग होता का? तसंच भाविकांची हत्या नक्की जुन्या भांडणांच्याच वादातून झाली का? याचा तपास आता शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

मंदिर परिसरात वादावादी, अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

दिल्लीत माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या, उशीने तोंड दाबून जीव घेतला

तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या भावाची लष्कर भरती करतो, 57 जणींना गंडवणारा ‘दादला’ पुण्यात अटकेत

(Thane Ambernath 21 years old Bhavik Shinde Murder five accuse arrested)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.