आज सर्वत्र गौरीची पुजा, पण आदिवासी पाड्यावर महिलांना आजही सजा! हृदयद्रावक घटना, गर्भवतीची झोळीतच प्रसूती, बाळ दगावलं

डॉक्टरांनी या महिलेचं बाळ दगावलं असल्याचं सांगितल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून गावातील लोक या महिलेला झोळीतून घेऊन जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.

आज सर्वत्र गौरीची पुजा, पण आदिवासी पाड्यावर महिलांना आजही सजा! हृदयद्रावक घटना, गर्भवतीची झोळीतच प्रसूती, बाळ दगावलं
गरोदर महिलेला झोळीतून घेऊन जाताना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 8:42 AM

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील भिवंडी-वाडा मार्गावर एका आदिवासी महिलेसोबत अंगावर शहारे आणणार प्रसंग घडला. भररस्त्यामध्ये एका महिलेची प्रसूती (Pregnant Women) झाली. रस्ता नसल्यानं झोळी करुन या महिलेला उपचारासाठी गावातील लोकं घेऊन चालले होते. पण वाटेतच या महिलेची प्रसूती झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वेळीच उपचार न मिळाल्याने या महिलेच्या बाळाचा मृत्यू झाला. या महिलेनं 9 महिने आपल्या पोटात ज्या बाळाला वाढवलं, त्याचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. या महिलेला उपचारासाठी घेऊन जातानाचा व्हिडीओदेखील (Emotional Video) समोर आला आहे. गुरुवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं आदिवासी पाड्यातील महिलांना वैद्यकीय उपचारांअभावी मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागत असल्याचं या घटनेमुळे अधोरेखित झालंय.

रस्ता नसल्यानं अडचण

दर्शना महादू फरले ही महिला गर्भवती होती. या महिलेला 1 सप्टेंबर रोजी प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. पण दिघाशी गावातील धर्मीचा पाडा इथं राहत असलेल्या या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रस्त्याची सोयच नव्हती.

अखेर गावातील लोकांनी एक चादर घेतली. चादरीची झोळी करुन गर्भवती महिलेला त्यात झोपवलं. गावातील लोकांनी झोळीतून दर्शना फरले या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी निघाले. पण वाटेतच या महिलेची झोळीमध्येच प्रसूती झाली.

हे सुद्धा वाचा

..आणि बाळ दगावलं!

त्यानंतर या महिलेला आणि तिच्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी या महिलेचं बाळ दगावलं असल्याचं सांगितल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून गावातील लोक या महिलेला झोळीतून घेऊन जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.

पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने चार दिवस अगोदर या महिलेला रुग्णालयात दाखल होण्यासाठीची सूचना करण्यात आली होती, असं आरोग्य अधिकारी डॉ. माधव कवळे यांनी म्हटलंय. 24 ऑगस्ट रोजी ही महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आलेली होती. तेव्हा तिची प्रकृती उत्तम होती, असंही त्यांनी म्हटलंय.

स्थानिक आशासेविकाही दर्शनाच्या संपर्कात होत्या. पण महिलेला अचानक प्रसूती कळा सुरु होऊन तिने वाटेतच बाळाला जन्म दिला. यामुळे वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे तिच्या बाळाचा मृत्यू झाला असावा, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नेहमीच या भागातील गरोदर महिलांना झोळीतून न्यावं लागतं, असं स्थानिक रहिवाशांनी म्हटलंय. त्यामुळे चिमुकल्यांचे जीव वाचवण्यासाठी रस्ता कधी बांधणार, प्रशासनाला जाग कधी येणा? असा सवालही उपस्थित केला जातोय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.