ठाणे : विसर्जनासाठी (Artificial lake in Thane) तयार केलेल्या कृत्रिम तलावामध्ये बुडून सात वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू (7 year boy drowned) झालाय. ही घटना ठाण्यातील राबोडी (Rabodi, Thane) परिसरात घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. तर लहान मुलाच्या मृत्यूला पालिका प्रशासनाचा निष्काळीपणा कारणीभूत ठरला, असा आरोप केला जातोय. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे सात वर्षांचा चिमुरडा बुडाला, असं स्थानिकांनी म्हटलंय. मृत्यू झालेल्या मुलाचं नाव जिहाद शेख असं असून, हा सात वर्षीय मुलगा अपना नगर परिसरात राहायला होता, अशी माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.
शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ठाण्यातील राबोडी परिसरात आंबोघोसाळे तलाव इथं सात वर्षांचा चिमुरडा बुडाला. लहान मुलगा बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी तलावाच्या ठिकाणी धाव घेतली.
त्यानंतर या मुलाचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह नंतर पुढील तपसाणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मुलाला मृत्यू कृत्रिम तलावात पोहताना झाला, असं सांगितलं जातंय. पाण्याचा अंदाज न आल्यानं सात वर्षांचा चिमुरडा कृत्रित तलावात बुडाला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडून जारी करण्यात आली आहे.
ठाणे प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून कृत्रिम तलाव बांधण्यात आले. पण सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याकारणाने सात वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला, अशा आरोप केला जातोय.
गेल्या दोन दिवसांपासून या कृत्रिम तलावात फारसं कुणी फिरकलं नव्हतं. त्यामुळे मजा मस्ती करण्यासाठी जवळच्या झोपडपट्टीतील मुलं कृत्रित तलावाच्या पाण्यात पोहण्यासाठी जात होती, असं सांगितलं जातंय. शुक्रवारी या कृत्रिम तलावाच्या भोवती कोणतंही बॅरीकेंटींग करण्यात आलेलं नव्हतं. शिवाय कुणी सुरक्षा रक्षकही या ठिकाणी तैनात नव्हता. त्यामुळे हा सात वर्षांचा मुलगा तलावात पोहण्यासाठी जाऊ शकला. जर या दोन गोष्टी असत्या, तर या मुलाचा जीव वाचू शकला असता, असं पोलिसांनी म्हटलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साडेसात आठ वाजण्याच्या सुमारात काही मुलांचा आरडाओरडा तलावाच्या ठिकाणी सुरु झाला. तेव्हा लोकं जमले आणि त्यांना एका मुलाचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळला. पाचच मिनिटांत बचावपथक कृत्रिम तलावापाशी पोहोचलं आणि त्यानंतर या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलं. पण रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.