बॉयफ्रेंडने सोबत यायला सांगितले, तरुणीने नकार दिला; संतापलेल्या आरोपीने केले ‘हे’ कृत्य

घटनेची माहिती मिळताच शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी तात्काळ दोघी मायलेकींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

बॉयफ्रेंडने सोबत यायला सांगितले, तरुणीने नकार दिला; संतापलेल्या आरोपीने केले 'हे' कृत्य
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 4:17 PM

मुंबई : गर्लफ्रेंडने सोबत यायला नकार दिला म्हणून माथेफिरु बॉयफ्रेंडने तरुणीसह तिच्या आईवर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची घटना ठाणे शहरात उघडकीस आली आहे. सुरेश रामदास वाडेकर असे हल्ला करणाऱ्या 22 वर्षीय बॉयफ्रेंड (Boyfriend)चे नाव आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक (Arrest) केली आहे. आरोपीविरोधात कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

पीडित 18 वर्षीय तरुणी, तिची आई आणि आरोपी 22 वर्षीय बॉयफ्रेंड तरुणीच्या घोडबंदर येथील घरी राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी शहरात जोरदार पाऊस पडत होता. यावेळी आरोपीने तरुणीला आपल्यासोबत आपल्या घरी चलण्यास सांगितले.

तरुणीने सोबत येण्यास नकार दिल्याने तरुण संतापला

मात्र तरुणीने पावसात बाहेर पडण्यास नकार दिला. पाऊस थांबल्यानंतर जाऊन तरुणीने बॉयफ्रेंडला सांगितले. यामुळे सनकी बॉयफ्रेंड चिडला आणि त्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी तरुणीची आई मध्ये पडली असता आरोपीने तिच्यावरही हल्ला केला.

हे सुद्धा वाचा

हल्ल्यात तरुणी आणि तिची आई जखमी

या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी तात्काळ दोघी मायलेकींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

यानंतर आई आणि मुलगी दोघींनी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. तर जखमींवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.