चोरट्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या डॉक्टरचं घरही सोडले नाही! सोमवारी पहाटे काय घडलं?

Dr Sandesh Mayekar : चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांकडून या चोरीप्रकरणी पंचनामा केला जातो आहे.

चोरट्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या डॉक्टरचं घरही सोडले नाही! सोमवारी पहाटे काय घडलं?
मयेकरांच्या घरी चोरीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 10:10 AM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी अभिनेत्यांचे डेन्टीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर संदेश मयेकर (Dr Sandesh Mayekar) यांच्या घरी चोरी झाली आहे. सोमवारी पहाटे चोरीची ही घटना घडली. या चोरीप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात (Bandra Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांकडून (Mumbai Crime News) अधिक तपास केला जातो आहे.

डॉक्टर संदेश मयेकर हे मुंबईतील एक प्रसिद्ध डेन्टिस्ट आहेत. मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत अनेक नेते, अभिनेते त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येत असतात. डॉक्टर संदेश मयेकर यांच्या घरी चोरी झाल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबईतील वांद्रे येथे संदेश मयेकर यांचं घर आहे. वांद्रे पश्चिमेच्या बॅन्ड स्टॅन्ड या भागात राहत असलेल्या संदेश मयेकर यांच्या घरावर चोरांनी डल्ला मारलाय.

डॉ. मयेकर यांच्या निवासस्था नाबाहेरुन थेट आढावा : Video

हे सुद्धा वाचा

चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांकडून या चोरीप्रकरणी पंचनामा केला जातो आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, घरातून नेमकं काय काय चोरीला गेलं, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. डॉक्टर संदेश मयेकर यांच्या घरातून नेमकं काय काय चोरीला गेलंय, याचा तपास केला जातोय. तसंच अज्ञात चोरांचाही शोध घेण्यासाठी समांतर तपास मोहीम राबवली जाते आहे.

वांद्रेतील बॅन्डस्टॅन्ड परिसर हा प्रतिष्ठीत लोकवस्तीसाठी ओळखला जातो. या परिसरात डॉक्टर संदेश मयेकर यांच्या घरात चोरीची घटना उघडकीस आली असल्याने पोलिसांकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, आणि इतर बाबीची कसून चौकशी आता पोलीस करत आहे. या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.