घरातील तिघांनी आधी उंदिर मारायचं औषध घेतलं, नंतर पोलिसांना फोन, पण जे नको घडायला होतं ते घडलंच

कोरोना संकटामुळे अनेकांचं आर्थिक गणित बदललं आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती किंवा घरचं बजेट ढासळलंय. या आर्थिक संकटाचा सामना करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. पण या संकटाचा सामना करत असताना अनेक माणसं नैराश्यात जात आहेत.

घरातील तिघांनी आधी उंदिर मारायचं औषध घेतलं, नंतर पोलिसांना फोन, पण जे नको घडायला होतं ते घडलंच
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 5:42 PM

नवी मुंबई : कोरोना संकटामुळे अनेकांचं आर्थिक गणित बदललं आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती किंवा घरचं बजेट ढासळलंय. या आर्थिक संकटाचा सामना करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपल्याला आणखी जोमात काम करुन पुढे जायला हवंय. पण या संकटाचा सामना करत असताना अनेक माणसं नैराश्यात जात आहेत. त्यातूनच काही माणसं थेट आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. नवी मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांनी हे टोकाचं पाऊल उचललं. तिघांनी उंदिर मारण्याचं विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यातही आलं होतं. पण दुर्देवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही नवी मुंबईतील वाशी शहरात घडली. एकाच कुटूंबातील तिघांनी आर्थिक नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृतकांनी शुक्रवारी (29 ऑक्टोबर) रात्री उंदीर मारायचे औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मृतकांमध्ये 87 वर्षीय आई मोहिनी कामवानी, मुलगा दिलीप कामवानी (वय 67), मुलगी कांता कामवानी (वय 63) यांचा समावेश आहे.

पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल

मृतकांनी विषारी औषध घेतल्यानंतर पोलीस कंट्रोल रुमला फोन करत माहिती दिली होती. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मृतकांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वाशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळी 5 पानी सुसाईड नोट

वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी सांगितले की 29 ऑक्टोबर रोजी रात्री तिघांनी उंदीर म्रुचर औषध प्राशन केलं होतं. त्यानंतर 30 ऑक्टोबरला सकाळी पोलीस कंट्रोल रूममधून माहिती मिळाली की एका कुटुंबातील तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यावर तिघांना वाशी मनपा रुग्णालयात दाखल केला. मात्र औषध जास्त घेतल्याने तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळी 5 पानी सुसाईड नोट मिळाली आहे. सध्या आत्महत्या करण्याचा उद्देश काय आणि या सुसाईड नोटमध्ये काय लिहलेय त्याची चौकशी सुरु आहे.

महिला बँक अधिकारीचा मृत्यू

दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या अयोध्येत एका 30 वर्षीय महिला बँक अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. महिला अधिकाऱ्याने तिच्या आपल्या राहत्या घरात आत्महत्या केलीय. पोलिसांनी घराचं दार तोडून महिलेच्या घरात आत प्रवेश केला. तिथे महिला पंख्याला गळफास घेतलेल्या अनस्थेत आढळली. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिलेली होती. त्यामध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांनी नावे लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांचा अधिकचा तपास सुरु आहे.

हेही वाचा :

CCTV VIDEO | मटण शॉपमधून 9 बकरे चोरीला, दुसऱ्यावर आळ घेण्याचा डाव सीसीटीव्हीमुळे फसला

टायर फुटल्याने सांगलीत कारने दिंडीला चिरडलं, तिघा भाविकांचा करुण अंत

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.