मुंबई : गुरुवारी उत्तराखंडमध्ये भाविकांच्या बोलेरो (Bolero Car Accident) गाडीचा भीषण अपघात झाला. बोलेरो कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू (Three Devotees killed) झाला अशून इतर दहा जण गंभीर जखमी झाले आहे. उत्तरकाशीमध्ये यमुनोत्रीच्या मार्गावर असताना हा भीषण अपघात घडला. या अपघातामधील मृतांमध्ये महाराष्ट्राच्या मुंबई आणि भंडारा जिल्ह्यातील भाविकांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री उशीरा अपघाताची ही घटना घडली. यमुनोत्रीच्या धामपासून 28 किलोमीटर दूर बोलेरो (Mahindra Bolero) कारचा भीषण अपघात झाला. ओजरीजवळ झालेल्या या अपघातामुळे तिघे जागीच गतप्राण झालेत. तर गंभीर जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.
अशोक महादेव राव, वय 40, नागपूर
पुरण नाथ, वय 40, अंधेरी पूर्व, मुंबई
जयश्री अनिल कोसरे, 26, तुमसर, भंडारा जिल्हा
घाट रस्त्यावरील एका तीव्र वळणावर हा भीषण अपघात झाला. समोरुन येणाऱ्या बसला साईड देण्यासाठी कार चालकानं गाडी रिव्हर्स घेतली. त्याचवेळी गाडीवरीन नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट दरीतच कोसळली. मागे जाऊन कार थेट दरीत कोसळल्यानं रात्रीच्यावेळी एक गोंधळ उडाला होता.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पोलीस आणि बचावयंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर जखमींना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं.
एकूण दहा जण अपघातातमध्ये जखमी झालेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातामध्ये बचावलेल्या दहा जणांना लहान मुलं आणि तरुणांचा समावेश आहेत.
कृषिता, वय 15
रचना, वय 38
मोनिका, वय 24
दिनेश, वय 35
लक्ष्मी, वय 46
बाळकृष्ण जीटू, वय 41
प्रमोद तुलसी, वय 52
प्रेरणा, वय 8
बोदी, वय 10
अंजू अशोक राव, वय 4