VIDEO : भर दिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ, सीसीटीव्हीत घटना जशीच्या तशी
दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला टिटवाळा पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्याकडून लूटण्यात आलेले दागिने हस्तगत केले आहेत.
टिटवाळा (ठाणे) : दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला टिटवाळा पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्याकडून लूटण्यात आलेले दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव रोहीदास शांताराम वेढे असे आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याणनजीक टिटवाळ्यात एका ज्वेलर्सच्या दुकानात लूटीची घटना ताजी असताना शुक्रवारी (1 ओक्टोबर) पावणे चार वाजेच्या सुमारास टिटवाळा येथील मांडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. मांडा परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय रिमा ओंकार कुंभार या महिला रस्त्याने चालत जात असतान एक चोरटा रस्त्याच्या एका बाजूला उभा होता. रिमा चालत जात असताना चोरट्याजवळ पोहोचल्या तेव्हा त्याने रिमा यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर चोरटा पसार झाला.
पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?
संबंधित घटना सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. पोलीस मित्र लिसान काबाडी यांच्या मदतीने या चोरट्याचा पोलिसांना सुगावा लागला. पोलीस सचिन गायकवाड, सुनिल कोर, किरण जाधव या तिघांनी या चोरट्याला ताब्यात घेतले.
चोरट्याला दोन तासात बेड्या
रोहिदास वेढे असे या चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा अकोले येथे राहणार आहे. तो सध्या मांडा येथील चाळीत राहतो. त्याच्याकडून चोरीस गेलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत. या चोरट्याने याआधी देखील असा काही प्रकार केला का? याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, चोरट्याला दोन तासात अटक केल्याने टिटवाळ्यात पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
घटनेचा व्हिडीओ बघा :
VIDEO : भर दिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ, सीसीटीव्हीत घटना जशीच्या तशी#CCTV #chainsnatching #Crime pic.twitter.com/7x2S7BuWe9
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2021
अंबरनाथमध्ये किराणा दुकानात सोनसाखळी चोरी करणारे जेरबंद
दुसरीकडे अंबरनाथच्या खुंटवली परिसरात नुकतंच सोनसाखळी चोरीची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी या चोरीचा उलगडा देखील केला आहे. या सोनसाखळी चोराला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून अन्य गुन्ह्यांचीही उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
अंबरनाथच्या खुंटवली परिसरात आशा कराळे यांचं टेलरिंग आणि किराणा दुकान आहे. या दुकानात 26 ऑगस्ट रोजी दुपारी दोन सोनसाखळी चोरांनी बिस्कीट घेण्याच्या निमित्तानं जाऊन आशा कराळे यांचं मंगळसूत्र चोरलं होतं. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. अरविंद वाळेकर यांचं निवासस्थान सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ठिकाण आहे. त्यांच्या घरासमोरच चेन स्नॅचिंग झाल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?
या घटनेनंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु होता. या दरम्यान आरोपी प्रकाश उर्फ पिल्ल्या प्रकाश ठमके याला भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली. त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी त्याचा ताबा घेत चौकशी केली असता त्याने खुंटवलीतील चेन स्नॅचिंग आपणच केल्याची कबुली दिली. या चोरीसाठी वापरलेल्या टीव्हीएस अँटोरक्यू आणि यामाहा ब्लॅक गोल्ड या गाड्या शिवाजीनगर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली आरोपी आरोपी प्रकाश ठमके याने दिली आहे.
हेही वाचा :
प्रियकरासोबत पतीचा काटा काढला, नंतर पतीला न्याय मिळावण्याचं नाटक करत वर्षभर टीव्ही चॅनलसमोर आक्रोश