Video | मारहाण करत जवानाला लुटले; आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद

डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रात्रीच्या सुमारास घराकडे परतणाऱ्या एका नेव्ही कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून दोन आरोपींनी पोबारा केला होता. या आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे.

Video | मारहाण करत जवानाला लुटले; आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद
आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 6:20 PM

ठाणे : डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रात्रीच्या सुमारास घराकडे परतणाऱ्या एका नेव्ही कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्याजवळील मोबाईल (Mobile theft) हिसकावून दोन आरोपींनी पोबारा केला होता. डोंबिवली पूर्वमध्ये (Dombivli East) ही घटना घडली होती. ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली. या प्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेजेच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला व अवघ्या काही तासांमध्येच चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुदर्शन पटेल आणि अमित वागरे असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परवा रात्री साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली होती.

आरोपींनी पाठलाग करत केली मारहाण

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  डोंबिवली पूर्व येथे राहणारे सुदेश आमकर हे नेव्ही मध्ये नोकरी करतात .परवा रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुदेश पार्टीवरून घरी परतत होते.  ते स्वामी नारायण मंदिराजवळ पोहोचले असता दोन जणांनी  त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर जाताच त्यांनी सुदेश यांना पकडले व मारहाण करत त्यांच्याजवळील किमती मोबाईल हिसकावून पळ काढला. रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली होती.

सीटीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना बेड्या

दरम्यान याप्रकरणी सुदेश यांनी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच  रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकाने तपास सुरू केला पोलिसांनी या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सुदेश अमकर यांना मारहाण करताना दोन तरुण पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आढळून आले. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. सुदर्शन पटेल आणि अमित वागरे असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. पुढील तपास सुरू असून, आरोपींचा या प्रकारच्या आणखी काही गुन्ह्यात हात आहे का? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Nagpur Crime | नागपुरात गेस्ट हाऊसमध्ये जुगाराचा डाव, पोलिसांच्या छाप्यात सापडलं काय?

Kolhapur Crime : कोल्हापूरात मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलाच्या कुटुंबियांवर हल्ला

कार पार्क करताना तरुणीचा अंदाज चुकला, दुसऱ्या मजल्यावरुन पडून गाडी पलटी, खाली उभी कार तर सपाटच

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.