महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणं पडणार महागात, दोन सख्खे भाऊ ताब्यात

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी एका वृद्ध जोडप्यासह अन्य काही लोकांमध्ये खाद्यपदार्थ विकण्यावरून वाद झाला. त्यावेळी महिला पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) काही होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाद मिटवण्यासाठी तेथे पोहोचल्या.

महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणं पडणार महागात, दोन सख्खे भाऊ ताब्यात
टिटवाळ्यात महिलेला मारहाणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 1:15 AM

मुंबई : पालघरमध्ये एका महिला पोलिसाला मारहाण (Beating) करणे दोन भावांना चांगलेच महागात पडले आहे. आरोपींनी केवळ महिला पोलिसालाच नाही तर तिच्यासोबत असलेल्या पुरुष पोलिसालाही मारहाण केली. या घटनेनंतर आरोपी भावां (Brothers)ना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. विकास अशोक बल्लाळ आणि संदीप बल्लाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यातील बोईसर येथे मंगळवारी रात्री 11.45 च्या सुमारास गणेश विसर्जनाच्या वेळी ही घटना घडल्याचे पोलिस प्रवक्ते सचिन नावडकर यांनी सांगितले.

वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारले

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी एका वृद्ध जोडप्यासह अन्य काही लोकांमध्ये खाद्यपदार्थ विकण्यावरून वाद झाला. त्यावेळी महिला पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) काही होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाद मिटवण्यासाठी तेथे पोहोचल्या.

यादरम्यान आरोपींनी महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण इतके वाढले की हाणामारी झाली. एवढेच नाही तर महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या मदतीसाठी आलेल्या पीएसआय शरद सुरळकर यांनाही शिवीगाळ सुरू केली.

हे सुद्धा वाचा

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपींनी शरद सुरळकर यांना जमिनीवर आपटले. तसेच त्यांना लाथाही मारण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोन भावांना अटक करण्यात आली, तर आई आणि बहिणीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याशी संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांनी अद्याप दोन्ही महिलांना अटक केली नसून पुढील तपास सुरू आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.