पीएनबी घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सीला झटका, सीबीआयने दाखल केले दोन नवे गुन्हे

सीबीआयने चोक्सी आणि गीतांजली रत्न नक्षत्र ब्रांड विरोधात दोन एफआयआर दाखल केले आहेत. सीबीआयने चोक्सीला दिलेला हा मोठा झटका मानला जात आहे.

पीएनबी घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सीला झटका, सीबीआयने दाखल केले दोन नवे गुन्हे
मेहुल चोक्सीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 6:55 PM

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तब्बल 6000 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला आणि सध्या फरार असलेला मेहुल चोक्सी याच्या विरोधात सीबीआयने नव्याने दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे चोक्सीच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, कायदेशीर कारवाईचा फास आणखीन आवळला आहे. सीबीआयने चोक्सी आणि गीतांजली रत्न नक्षत्र ब्रांड विरोधात दोन एफआयआर दाखल केले आहेत. सीबीआयने चोक्सीला दिलेला हा मोठा झटका मानला जात आहे. 55.27 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने हे गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून हे गुन्हे दाखल केल्याची माहिती सीबीआयमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

जानेवारी 2018 मध्ये दाखल झाला होता पहिला गुन्हा

जानेवारी 2018 च्या सुरुवातीलाच पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 13000 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. या घोटाळ्याने बँकिंग आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली होती. देशभरातील हजारो गुंतवणूकदारांचा पैसा या घोटाळ्यामध्ये बुडाला.

या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने 30 जानेवारीला गुन्हा दाखल केला होता. मात्र कारवाईची कुणकुण लागल्यामुळे घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला डायमंड व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे दोघे त्या आधीच देशाबाहेर पळाले होते. तेव्हापासून दोघांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

निरव मोदी हा ब्रिटनमध्ये असून तेथील गृह मंत्रालयाने त्याच्या प्रत्यार्पणासाठी मंजुरी दिली आहे. मात्र या मंजुरीला निरव मोदीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सीबीआयने मेहुल चोक्सीविरोधात मार्च महिन्यात एक गुन्हा दाखल केला होता.

चोक्सीने हिरे आणि दागिने गहाण ठेवून घेतले होते कर्ज

चोक्सीने आयएफसीआयकडे हिरे आणि दागिने गहाण ठेवून तब्बल 25 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या प्रकरणात सीबीआयने चोक्सी आणि त्याची कंपनी गीतांजली जेम्ससह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दागिने नकली असल्याचे तपासात उघड

धक्कादायक बाब म्हणजे चोक्सीने कर्ज घेण्यासाठी जे हिरे आणि दागिने गहाण ठेवले होते ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्याचबरोबर ते दागिने बनावट असल्याचेही धक्कादायक सत्य तपासणीतून उघड झाले होते.

आयएफसीआयने तक्रार केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणी कारवाईचे पाऊल उचलले होते. याचदरम्यान नव्याने दोन गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे चोक्सीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.