इथून सोसायटीच्या महिला-मुली जातात, इथे लघवी का करता? जाब विचारणाऱ्याची दोन नराधमांकडून निघृण मारहाण
वसईत दोन विकृतांचा दांडपणा समोर आला आहे. या विकृतांनी सोसायचीच्या बाजूला लघूशंका केली. यावेळी परिसरातील एका 49 वर्षीय व्यक्तीने त्यांना याबाबत जाब विचारला. या ठिकाणावून महिला-मुली जातात. सोसायटीच्या बाजूला लघवी का करता? असा सवाल केला.
वसई (पालघर) : काही विकृत माणसं विकृतपणा करतातच, पण त्यासोबत दुसऱ्यांना देखील प्रचंड छळतात. विकृतांना वठणीवर आणणं हेच मोठं आव्हान आहे. हे विकृत देशाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यात सापडतील. अशा विकृतांचा माज ठेचणं हाच यावरील योग्य उपाय आहे. जेणेकरुन ते पुन्हा तसा विकृतपणा करणार नाहीत. वसईत अशाच दोन विकृतांचा दांडपणा समोर आला आहे. या विकृतांनी सोसायटीच्या बाजूला लघूशंका केली. यावेळी परिसरातील एका 49 वर्षीय व्यक्तीने त्यांना याबाबत जाब विचारला. या ठिकाणावून महिला-मुली जातात. सोसायटीच्या बाजूला लघवी का करता? असा सवाल केला. याच गोष्टीचा राग मनात ठेवून दोन तरुणांनी संबंधित व्यक्तीला थापड, बुक्क्या आणि लाकडी दांड्याने जबर मारहाण केली.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही वसईच्या डिजी नगर दिवणामान परिसरातील चित्रा अपार्टमेंटजवळ घडली. 6 ऑगस्टला दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तरुणांनी केलेल्या मारहाणीत 49 वर्षीय तिलकन बाळकृष्ण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा पाय, बरगडी फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांच्यावर वसईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी तरुण हे 49 वर्षीय व्यक्तीसोबत असं वागूच कसे शकतात. त्यांच्यावर योग्य कारवाई व्हायला हवी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली होती. त्यामुळे पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रविवारी (8 ऑगस्ट) दोन्ही आरोपींना अटक केली.
अरोपींना अखेर बेड्या
सुरज यादव (वय 30) आणि राकेश घोष (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही वसई ओमनगर, दिवणामान परिसरातील राहणारे आहेत. त्यांच्या विरोधात वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात कलम 323, 326,506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :