लोखंड वितळवताना उडाला आगीचा भडका! कामागाराचं आयुष्य बेचिराख, मृत्यूशी झुंज अपयशी

वसईतील इंजिनिरींग कंपनीत सुरेश पाटील हा तरुण कामाला होता. वसई सातीवली परिसरात असलेल्या वॅन्सन इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत तो नेहमीप्रमाणे कामावर हजर झाला होता. पण दुपारी 1 वाजताच्या सुमारास सुरेशवर काळानं घाला घातला.

लोखंड वितळवताना उडाला आगीचा भडका! कामागाराचं आयुष्य बेचिराख, मृत्यूशी झुंज अपयशी
तरुण कामकाराचा दुर्दैवी अंतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 8:04 AM

पालघर : वसईतील (Vasai News) एका इंजिनिअरींग कंपनीत काम करणाऱ्या तरुण कामगाराचा (Young Labour Died) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काम करतेवेळी आगीचा (Fire Spark) भडका उडाल्याने हा तरुण भाजला गेला होता. गंभीररीत्या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून कंपनीतील इतर कामगारही धास्तावलेत.

सुरेश रमेश पाटील असं मृत्यू झालेल्या तरुण कामगाराचं नावं आहे. सुरेश पाटील हा तरुण अवघ्या 31 वर्षांचा होता. काम करताना लागलेल्या आगीत तो भाजला गेला. मोठ्या प्रमाणात भाजला गेल्यानं त्याची प्राणज्योत मालवली. जखमी झाल्यानंतर त्याची मृत्यूशी झुंज सुरु होती. पण अखेर ती अपयशी ठरली.

पाहा LIVE घडामोडी : Video

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

वसईतील इंजिनिरींग कंपनीत सुरेश पाटील हा तरुण कामाला होता. वसई सातीवली परिसरात असलेल्या वॅन्सन इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत तो नेहमीप्रमाणे कामावर हजर झाला होता. पण दुपारी 1 वाजताच्या सुमारास सुरेशवर काळानं घाला घातला. कंपनीत सुरेश लोखंड वितळवण्याचं काम करत होता. त्यावेळी अचानक आगीचा भडका सुरेश पाटील या तरुणाच्या अंगावर उडाला.

आगीचा भडका उडाल्यानं सुरेश भाजला गेला. गंभीर जखमी झालेल्या सुरेश पाटील या तरुणाला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. सुरेश पाटीलच्या दुर्दैवी मृत्यूने कंपनीतील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तर तरुण मुलाच्या मृत्यूने पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास केला जातो आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. सुरक्षेची काळजी घेण्यात आली नव्हती का, याबाबत पोलिसांसून शोध घेतला जातो आहे. इतर कामगार आणि कंपनीतील लोकांची पोलिसांकडून सध्या चौकशी केली जातेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.