वसई : वसईतील भुईगाव किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम सुरु होती. या स्वच्छता मोहिमेदरम्यान थोडेथोडके नव्हे तर तब्बल 57 हजार रुपये आढळून आले. स्वच्छा मोहिम सुरु असताना काही नोटा दोघा व्यक्तींना आढळल्या. त्यांना त्या गोळ्या गेल्या. मोजून पाहिल्या तर त्याची किंमत तब्बल 57 हजार रुपये असल्याचं समोर आलं. पण नोटा मिळाल्याचा हा आनंद काही फार काळ टिकू शकला नाही. कारण आढळून आलेल्या सर्व नोटा या जुन्या चलनातील होत्या.
वसईतील लिसबन फराव आणि सुजाव फराव हे आपल्या दोन मुलांसब भुईगाव किनाऱ्यावर रविवारी स्वच्छता मोहीम राबवत होता. त्यावेळी त्यांना एक बॅग आढळून आली. ही बॅग जेव्हा त्यांना उघडली, तेव्हा बॅगमधील नोटा पाहून ते चकीतच झाले.
भुईगाव किनाऱ्यावर फराव यांना आढळलेल्या बॅगमध्ये चक्क जुन्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. या मध्ये 1 हजार रुपयांच्या 3 आणि इतर 500 रुपयांच्या नोटा होता. या नोटा मोजल्या असत्या त्यांची किंमत 57 हजार रुपये इतकी आढळून आली.
फराव कुटुंबीयांना जुन्या नोटांनी भरलेली ही पैशांची बॅग थेट वसईतील भुईगाव पोलीस चौकीत जमा केली. आता पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.
फराव कुटुंबीय गेल्या सहा वर्षांपासून वसई समुद्र किनाऱ्यावर दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवतात. या कुटुंबीयांशी अनेक सामाजिक संस्थादेखील जोडल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत फराव कुटुंबियांच्या माध्यमातून तब्बल 700 टन कचरा जमा केला असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आता जुन्या पाचशे आणि हजार रुपये नोटांच्या पैशांनी भरलेली ही बॅग कुणी किनाऱ्यावर टाकली, ती कुणाची आहे, याची उकल करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. याबाबत आता तपास करण्यास भुईगाव पोलिसांनी सुरुवात केलीय.