‘आमच्यातलं भांडण मिटवायला ये प्लीज’, ती गेली! कॉन्स्टेबलचं प्रेयसीसमोरच मित्राच्या बायकोसोबत हैवानी कृत्य
आधी घरी बोलवलं, मग जबरदस्ती दारु पाजली आणि जेव्हा तिची शुद्ध हरपली तेव्हा त्याच्यातला राक्षस जागा झाला
मुंबई : मित्राच्या बायकोवर पोलीस कॉन्स्टेबलने प्रेयसीसमोरच बलात्कार (Rape Case) केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. पोलीस हवालदाराने पीडितेला घरी बोलावलं. तिला दारु पाजली. त्यानंतर स्वतःच्या प्रेयसीसोबत त्याने पीडितेवर अतिप्रसंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय. वसईतील (Vasai Crime News) पोलीस हवालादारवर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा पोलीस हवालदार (Police Constable) सध्या फरार असून त्याचा शोध घेतला जातो आहे. तक्रारदार पीडित महिलेनं पोलीस हवालदारावर सनसनाटी आरोप केल्यामुळे पोलीस दलातील अधिकारीही हादरुन गेले आहेत.
18 ऑक्टोबर रोजी पीडितेने नालासोपारा पोलिसांत याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल राहुल लोंढे यांनी त्यांची प्रेयसी प्रिया उपाध्याय यांच्या समोरच पीडितेवर बलात्कार केला, असा आरोप करण्यात आल्यानं खळबळ उडालीय.
पोलीस तक्रारीनुसार, कॉन्स्टेबल लोंढे आणि त्यांची प्रेयसी एकाच ठिकाणी राहात होता. नालासोपारा पश्चिमेला वास्तव्यास आहेत. प्रेयसीच्या देखत आणि तिच्या मदतीनेच 23 आणि 24 सप्टेंबरच्या दरम्यान बलात्काराची ही घटना घडली, असा आरोप पीडितेनं केलाय.
पीडित महिला ही एका खासगी कंपनीत काम करते. तिने दिलेल्या माहितीनुसार, लोंढे आणि प्रिया उपाध्याय यांनी पीडितेला फोन करुन घरी बोलावलं होतं. भांडण मिटवण्यासाठी तिला घरी बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी पीडिता कॉन्स्टेबलच्या घरी गेली होती.
त्यावेळी लोंढे आणि त्यांची प्रेयसी प्रिया यांनी पीडितेला जबरदस्ती दारु पाजली. त्यानंतर कॉन्स्टेबलने पीडितेचे कपडे उतरवले आणि तिच्यासोबत संतापजनक कृत्य केलं, असा आरोप करण्यात आलाय. शुद्धीत नसलेल्या पीडितेसोबत कॉन्स्टेबलने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने बळजबरी लैंगिक संबंध ठेवले असल्याचा आरोप केलाय.
धक्कादायक बाब म्हणजे कॉन्स्टेबलची प्रेयसी प्रिया उपाध्याय हीनेदेखील आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेनं केलंय. बलात्काराच्या घटनेच्या 24 तासांनी पीडितेला घरी सोडण्यात आलं. घरी आल्यावर पीडितेनं हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला.
पीडितेचं म्हणणं ऐकल्यानंतर पतीने लोंढेला विचारणा केली. त्यावर लोंढे याने पतीला धमकावलं असंही तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी पीडितेनं ऑनलाईन तक्रार दाखल केलीय. सध्या पोलीस कॉन्स्टेबल लोंढे आणि त्याची प्रेयसी फरार आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.