Video : मद्यपी महिलेचा राडा, दारु पिऊन वर्दीवर हात, सानपाड्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओतील महिला पोलिसांच्या वर्दीपर्यत हात नेऊन पोलिसालाच शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय.

Video : मद्यपी महिलेचा राडा, दारु पिऊन वर्दीवर हात, सानपाड्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
मद्यपी महिलेचा वर्दीवर हातImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 12:52 PM

नवी मुंबई : मुंबई तसेच नवी मुंबईत अलिकडेच मद्यधुंद लोकांचे पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार वाढतायत. दारू पिऊन पोलिसांच्या वर्दीवर हात उचलण्यापर्यंत या मद्यपींची मजल जात असल्याचं समोर येतंय. अशातच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय. या व्हिडीओमध्ये एक मद्यपी महिला पोलिसांसोबत (Police) हुज्जत घालताना दिसत आहे. हा प्रकार सानपाडा पोलीस स्टेशनच्या (Sanpada station) हद्दीत घडल्याची माहिती आहे.  व्हिडीओमधील महिला एका चारचाकी समोर उभी राहून पोलिसांची कॉलर पकडताना दिसत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओतील महिला पोलिसांच्या वर्दीपर्यत हात नेऊन त्यांनाच शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय. पोलिसांसोबत होणारं गैरवर्तन आणि रस्त्यावर घाललेला राडा बघता अनेकांनी या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार काही नवा नाही. यापूर्वी देखील मद्यपींनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचे प्रकार घडले आहेत. अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचे तिनतेरा वाजवले जात असताना, पोलिसांवरच हात उचलला जात असताना कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

दारु पिऊन वर्दीवर हात

दारू पिऊन वर्दीवर हात उचलला जात असल्यानं मोठी चिंता व्यक्ती केली जातेय. पोलिसांचा धाक उरला की नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. मुंबई तसेच नवी मुंबईमध्ये मद्यपींचे गैरवर्तानाचे प्रकार सर्वाधिक घडत असल्याच दिसतंय. असे प्रकार वाढत असताना पोलिसांना यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कारण, पोलिसांचा धाक उरला नसल्याचंही बोललं जातंय. आता यावर पोलिसांना कडक पाऊलं उचलत अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.

हे सुद्धा वाचा

महिला पोलीसांची नियुक्ती गरजेची

तुम्ही व्हिडीओ पहिल्सास या व्हिडीत दोन पुरुष पोलीस कर्मचारीच दिसत आहेत. त्यामुळे त्यांना मद्यपी महिलेवर कारवाई करताना बंधन येताना दिसत आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात. त्या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी देखील असनं गरजेचं आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत होणारे गैरप्रकार टळू शकतील.

कारवाईची मागणी

व्हिडीओतील महिला पोलिसांच्या वर्दीपर्यत हात नेऊन पोलिसालाच शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय. पोलिसांसोबत होणारं गैरवर्तन आणि रस्त्यावर घातलेला राडा बघता अनेकांनी या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार काही नवा नाही. यापूर्वी देखील मद्यपींनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचे प्रकार घडले आहेत. अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचे तिनतेरा वाजवले जात असताना, पोलिसांवरच हात उचलला जात असताना कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.