Vinayak Mete Accident : विनायक मेटे अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट! चूक मेटेंच्या ड्रायव्हरचीच?

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या कार अपघातप्रकरणी ड्रायव्हरच्या अडचणी वाढल्या, कारण...

Vinayak Mete Accident : विनायक मेटे अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट! चूक मेटेंच्या ड्रायव्हरचीच?
विनायक मेटे अपघात प्रकरणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 11:48 AM

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कार अपघातप्रकरणी (Vinayak Mete Accident Death News) तीन महिन्यांनंतर मोठी कारवाई करण्यात आलीय. विनायक मेटे यांच्या कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीआयडीने (CID) हा गुन्हा दाखल केला आहे. रसायनी पोलीस स्थानकात विनायक मेटे यांचे कार चालक एकनाथ कदम (Eknath Kadam) यांच्या गुन्हा दाखल केलाय.

विनायक मेटे यांचा 14 ऑगस्ट रोजी अपघात झाला होता. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या या अपघातात विनायक मेटे यांना जबर मार बसून त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

लेन कटिंग आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात विनायक मेटे यांच्या कारचा अपघात झाला होता. ड्रायव्हरचं ओव्हरटेकिंग करताना जजमेन्ट चुकल्यानं हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातही तशी माहिती दिली होती.

हे सुद्धा वाचा

अपघात कसा झाला?

52 वर्षीय विनायक मेटे हे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. कारमधून मुंबईला येत असताना मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर विनायक मेटे यांची कार रायगड येथे एका बोगद्याजवळ अपघातग्रस्त झाली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत एक बैठक पार पडणार होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे मुंबईत येत होते. मात्र वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांची कार एकनाथ कदम चालवत होते. एकनाथ कदम हे एका अवजड वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याऐवजी त्यांनी कार डाव्या लेनमध्ये आणली. पण डाव्या लेनमध्ये आधीच एक अवजड वाहन होतं.

या ओव्हरटेकिंगच्या दरम्यान विनायक मेटे हे कारच्या मागच्या सीटवर बसलेले होते. अपघातावेळी कारची डावी बाजू अवजड वाहनाला धडकली आणि विनायक मेटे यांना जबर मार लागला आणि ते गंभीर जखमी झाले. विनायक मेटे यांनी नंतर कळंबोली येथील रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरीन अपघातांचा प्रश्नही ऐरणीवर आला होता.

अपघातानंतर मदत मिळायला उशीर झाला, असा दावा देखील विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला होता. दरम्यान, आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. नेमकी आता त्यांच्यावर कारवाई काय होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.