Virar Blast : विरारमध्ये चायनीजच्या दुकानात रहस्यमय ब्लास्ट! सिलिंडर, एसी सुरक्षित, मग ब्लास्ट कशाचा? गूढ वाढलं

रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारा चायनीजच्या दुकानातून प्रचंड मोठा आवाज झाल्यानं मनवेल पाडा परिसर हादरुन गेला होता.

Virar Blast : विरारमध्ये चायनीजच्या दुकानात रहस्यमय ब्लास्ट! सिलिंडर, एसी सुरक्षित, मग ब्लास्ट कशाचा? गूढ वाढलं
विरारमध्ये हॉटेलात स्फोटImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 7:18 AM

विरार : विरार मध्ये एका चायनीज दुकानात ब्लास्ट (Virar Blast News) झाला आहे. या ब्लास्टची तीव्रता एवढी मोठी होती की, दुकानाचे शटर, आतील सामान, सर्व तुटून पडले असून, रस्त्याने जाणारा एक पादचारी यात गंभीर जखमी झाला आहे. विरार पूर्व मनवेलपाडा रोड (Manvelpada Road) येथे असलेल्या सिग्नल वरील कॉर्नरच्या चायनीज दुकानात रात्री साडे आकाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुकानातील सर्व गॅस सिलेंडर, एसी कॉम्प्रेशर, फ्रीज हे सर्व सुरक्षित आहे. पण नेमका ब्लास्ट (Blast Video) कशाचा झाला हे मात्र स्पष्ट झाले नाही. वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान, विरार पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली आहे. मात्र ब्लास्टचे कारण स्पष्ट झाले नाही. अचानक झालेल्या ब्लास्टमुळे आजूबाजूच्या सोसायटी मधील राहिवाशात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा ब्लास्ट नेमका कशाचा, याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

नेमकं काय घडलं?

रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारा चायनीजच्या दुकानातून प्रचंड मोठा आवाज झाल्यानं मनवेल पाडा परिसर हादरुन गेला होता. दरम्यान, स्फोटासारखा आवाज झाल्यानं परिसरात भीती पसरली. तर यात एक जण जखमीही झाला. तसंच चायनीजच्या दुकानातील सामानालाही स्फोटसदृश्य आवाजाने फटका बसला. दुकानातीन बहुतांश सामानाचं नुकसान झालं. मात्र या स्फोटाचं कारण कळू न शकल्यानं या स्फोटाचं रहस्य वाढलंय.

हे सुद्धा वाचा

स्फोटाचं गूढ वाढलं

वारंवार ज्यामुळे स्फोट होतो, अशा घातक मानल्या जाणाऱ्या सिलिंडिरमुळे किंवा एसी कॉम्प्रेशरचा स्फोट झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र दुकानात पाहिल्यानंतर सिलिंडर आणि एसी कॉम्प्रेशन, इतकंच काय तर फ्रीजही सुरक्षित होता. त्यामुळे स्फोटाचा आवाज कशामुळे झाला, यावरुन चर्चांना उधाण आलंय. तर एका जखमी झालेल्या पादचाऱ्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

थोडक्यात अनर्थ टळळा

दुकान बंद झाल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय. मात्र प्रचंड मोठं आर्थिक नुकसान चायनीज हॉटेलात घडलाय. अचानक साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ब्लास्ट झाल्यानं परिसरात घबराट पसरली होती. या ब्लास्टची माहिती लगेचच अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर वसई विरार महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी पाहणी केली. तसंच हा नेमका ब्लास्ट कशामुळे झाला, याचा तपास आता केला जातो आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.