Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोक्कामधील वॉन्टेड आरोपी, नवी मुंबई पोलिसांनी सापळा रचला, आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, पण बेड्या ठोकल्याच!

मोक्कामधून सुटलेला तसंच अल्पवयीन मुलीवरील बलात्कारच्या गुन्ह्यामधील वॉन्टेड आरोपीला अग्निशस्त्रासह पनवेल गुन्हे शाखेने अटक केली आहे. (Wanted accused in Mocca arrested by Navi Mumbai Police)

मोक्कामधील वॉन्टेड आरोपी, नवी मुंबई पोलिसांनी सापळा रचला, आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, पण बेड्या ठोकल्याच!
मोक्कामधून सुटलेला तसंच अल्पवयीन मुलीवरील बलात्कारच्या गुन्ह्यामधील वॉन्टेड आरोपीला अग्निशस्त्रासह पनवेल गुन्हे शाखेने अटक केली आहे.
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 1:25 PM

नवी मुंबई : मोक्कामधून सुटलेला तसंच अल्पवयीन मुलीवरील बलात्कारच्या गुन्ह्यामधील वॉन्टेड आरोपीला अग्निशस्त्रासह पनवेल गुन्हे शाखेने अटक केली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील मोक्का केसमधून नुकताच सुटलेला, पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असलेला आरोपी प्रतिक मनोहर शिवपूज याला नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) बेड्या ठोकल्या आहेत. (Wanted accused in Mocca arrested by Navi Mumbai Police)

मोक्कामधील वॉन्टेड आरोपी

गोळीबार, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, चोरी, पोलिसांवर हल्ले करणारा सराईत गुन्हेगार आणि ठाणे आयुक्तालयाच्या अभिलेखावर बलात्कार, पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असलेला आरोपी प्रतिक मनोहर शिवपुज हा तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या जवळ अग्णिशस्त्रासह शेवरलेट कारमधून येणार असल्याची खात्रिशीर माहीती मिळाली होती. पोलिसांनी तिथूनच त्याला अटक केलीय.

सापळा रचून आरोपीला बेड्या

सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे ) विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-02 चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वखालच्या पथकाने तळोजा कारागृहाजवळ सापळा लावला. खबरीनुसार अगदी वेळेत तिथे कार येऊन थांबली. कारमधील इसमास पोलिसांची चाहूल लागल्याने तो पळून जाण्याच्या तयारीत असताना, सदर कारला पोलिसांच्यात ताफ्यातील एक कार आडवी लावुन थांबवण्याचा प्रयत्न केला.

सदर कार चालकाने त्याच्या हातातील कार फुटपाथवर चढवल्याने सदर कारच्या टायर फूटून ती थांबली. त्यानंतर लगेच चारही बाजूंनी सदर कारला घेराव घालून कारमधील प्रतिक तसंच त्याच्यासोबतचा लक्ष्मण माणिक राठोड (वय 21 वर्षे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

पिस्टल आणि जिवंत काडतूसं जप्त

प्रतिक शिवपुजे याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस आढळून आलं. तर लक्ष्मण राठोड याच्या खिशामध्ये दोन जिवंत काडतूसं मिळाली. आरोपींविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 325 अन्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

(Wanted accused in Mocca arrested by Navi Mumbai Police)

हे ही वाचा :

VIDEO | कल्याणमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक, व्हिडीओ व्हायरल

घरी सोडण्याच्या बहाण्याने बसस्टॉपला थांबलेल्या तरुणीवर बलात्कार, आरोपीला 10 वर्षांचा कारावास, नाशिक न्यायालयाचा निकाल

VIDEO | कल्याणमध्ये रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड, मदतीसाठी पोहोचलेल्या दोघांना जमावाची मारहाण

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.