CCTV : तिघा मैत्रिणींच्या चालत्या लोकलमधून एकामागोमाग एक उड्या! असं का केलं तिघींनी? Video बघाच

Mumbai Local CCTV Video : तिघा मैत्रिणींमधील एक मुलगी गाडीतून उडी टाकते.

CCTV : तिघा मैत्रिणींच्या चालत्या लोकलमधून एकामागोमाग एक उड्या! असं का केलं तिघींनी? Video बघाच
तरुणींची लोकलमधून उडीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 7:37 PM

मुंबई : धावत्या मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) चढणं जीवावर बेतू शकतं. अनेक वेळी समोर आलेल्या सीसीटीव्हीच्या (Mumbai local CCTV Video) घटनांनी ही बाब अधोरेखित केली आहेच. पण तरिही धावत्या लोकलमधून चढण्याचे आणि उतरण्याचे प्रकार काही थांबलेले नाही. आता समोर आलेली घटना जोगेश्वरी रेल्वे (Jogeshwori Railway Station) स्टेशनातील आहे. जोगेश्वरीला तिघी मैत्रिणी लोकलमध्ये चढल्या. पण स्टेशनवरुन लोकल सुटली आणि वेग पकडू लागली. इतक्यात एका तरुणीनं रेल्वेतून उडी टाकली. लोकलच्या विरुद्ध दिशेनं लोकलमधून उडी टाकणं या तरुणीच्या चांगलंच अंगलटही आलं. पण धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीच्या पाठोपाठ इतर दोघा तरुणींनीही याच लोकलमधून एकामागोमाग एक उड्या टाकल्या. या घटनेनं जोगेश्वरी रेल्वे स्थानकातील सगळ्यात प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिस अधिकारी कैसर खालिद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनीच या घटनेचा व्हिडीओही ट्वीटरवरुन शेअर केलाय. कैसर खालिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना 16 एप्रिल रोजी घटली. पश्चिम उपनगरीय मार्गावरच्या जोगेश्वरी रेल्वे स्थानकात अंगावर काटा येईल, अशी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसतंय?

जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवर एक लोकल थांबलेली आहे. तीन मैत्रिणी या लोकलममध्ये चढताना दिसता. इतरही प्रवासी लोकलमध्ये चढतात. थोड्याच वेळात लोकल स्टेशनवरुन सुटते. गाडी वेग पकडण्यास सुरुवात करते. इतक्यात तिघा मैत्रिणींमधील एक मुलगी गाडीतून उडी टाकते. लोकलच्या ज्या दिशेनं जात असते, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने उडी टाकल्यानं या तरुणी तोल पूर्णपणे जातो. तरुणी स्टेशनवरच कोसळते आणि लोकलच्या पायदान आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध फरफटते.

तोल गेलेली तरुणी स्टेशनवर कोसळते आणि रेल्वे स्टेशन आणि लोकलच्या मधल्या जागेतून ती चाकांखाली जाणार की काय, असं चित्र निर्माण होतं. याच दरम्यान, एक होमगार्डही मागच्या डब्यातून जीवाची बाजी लावत उडी टाकतो. मुलीला चाकाखाली जाण्यापासून रोखतो. तिला मागे ओढतो. मात्र याच सगळ्यात या मुलीच्या इतर दोन मैत्रिणीही लोकलमधून उड्या टाकतात. स्टेशनवरुन उड्या टाकलेल्या या दोन्हीही तरुणी सुदैवानं स्टेशनवर पडतात. मैत्रीन उतरल्याचं पाहून या दोघीही तरुणींनी धावत्या लोकलमधून उडी टाकल्याचं दिसून येतं.

जीआरपीचे होम गार्ड अल्ताफ शेख यांच्या प्रसंगावंधानामुळे या लोकलमधून उडी टाकणाऱ्या तरुणींचा जीव थोडक्यात वाचलाय. या होमगार्डनं बजावलेल्या कर्तव्याचं आणि त्याच्या धाडसाचं कौतुक करावं, तेवढं कमी आहे.

पाहा व्हिडीओ :

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.