अनन्या पांडेची आजची चौकशी संपली, उद्या पुन्हा वानखेडेंसमोर हजेरी, नेमकं काय-काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिची एनसीबीकडून जवळपास सव्वा दोन तास चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वत: एका महिला अधिकाऱ्यासोबत अनन्याची चौकशी केली.

अनन्या पांडेची आजची चौकशी संपली, उद्या पुन्हा वानखेडेंसमोर हजेरी, नेमकं काय-काय घडलं?
ncb raids
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 7:42 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिची एनसीबीकडून जवळपास सव्वा दोन तास चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वत: एका महिला अधिकाऱ्यासोबत अनन्याची चौकशी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अनन्याची आज झालेल्या चौकशीत पुरेशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे तिला उद्या पुन्हा सकाळी अकरा वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.

एनसीबी अधिकारी अनन्याच्या घरी धडकले

आता आर्यनने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एनसीबी पुन्हा सक्रिय झाली आहे. अनन्या पांडे हिचा जबाब आर्यनला जामीन मिळवण्यासाठी अडचणीचा ठरु शकतो. एनसीबीचे अधिकारी आज (21 ऑक्टोबर) सकाळी अनन्या पांडे हिच्या घरी धडकले. त्यांनी तिच्या घरची झडती सुरु केली. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या हिचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला. यानंतर तिला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावलं. तिला आज दुपारी 3 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याबाबतचं समन्स होतं. मात्र, ती 4 वाजता एनसीबी कार्यलयात हजर झाली. तिची जवळपास सव्वा तास चर्चा झाली.

एनसीबीच्या चौकशीत अनन्याला काय-काय विचारण्यात आलं?

विशेष म्हणजे समीर वानखेडे यांनी स्वत: अनन्याची चौकशी केली. यावेळी एक महिला अधिकारी देखील होत्या. त्यांनी अनन्याला तिच्या आर्यन सोबतच्या मैत्रीबाबत विचारलं. तसेच तिला ड्रग्स पेडलरबाबत विचारलं. तिच्यात आणि आर्यन यांच्यात झालेले संवाद तिला दाखवण्यात आले. त्या चॅटबाबत तिला विचारण्यात आलं.

चौकशी संपल्यानंतर एनसीबी कार्यालयाबाहेर पडताना अनन्या पांडे :

हेही वाचा : निव्वळ व्हॉट्सअ‌ॅप चॅटवरुन आर्यन, अनन्या अडकणार? उज्ज्वल निकम म्हणतात, प्रमोद महाजन खून खटल्यातही एक मेसेज होता

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.