वसई किनाऱ्यावर सुटकेसमधून दुर्गंध, उघडून पाहिलं तर धडापासून वेगळा असलेला महिलेचा मृतदेह

वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे.

वसई किनाऱ्यावर सुटकेसमधून दुर्गंध, उघडून पाहिलं तर धडापासून वेगळा असलेला महिलेचा मृतदेह
वसई किनाऱ्यावर धडकलेल्या सुटकेसमधून दुर्गंध, पोलिसांनी उघडून पाहिलं तर धडापासून वेगळा असलेला महिलेचा कुजलेला मृतदेह
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 6:30 PM

पालघर : वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेची हत्या करुन, मुंडक धडापासून वेगळं करून तो मृतदेह सुटकेसमध्ये भरुन समुद्रात फेकलेला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वसईच्या भुईगाव समुद्र किनारी आज दुपारी हा मृतदेह मिळाला आहे. सुटकेसमध्ये मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून मृतदेहाच्या अंगात ड्रेस घातलेला आहे.

नेमकं प्रकरण काय?

भुईगाव समुद्रकिनारी लाटांसोबत एक सुटकेस किनाऱ्यावर धडकली. या सुटकेसमधून दुर्गंध येत होता. त्यामुळे का काहीतरी विचित्र प्रकार असल्याचा संशय स्थानिकांना आला. यावेळी तेथील स्थानिक पोलीस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तातडीने या सुटकेस विषयीची माहिती पोलीस ठाण्यात दिली.

सुटकेस उघडल्यानंतर पोलीसही चक्रावले

सुटकेसची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुटकेसमधून खरंच प्रचंड दुर्गंध येत होता, हे त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी ती सुटकेस ताब्यात घेऊन उघडली असता त्यामध्ये महिलेचा मुंडकी नसलेला मृतदेह आढळला. सुटकेसमधील मृतदेह बघून पोलीसही हादरले. पोलिसांनी तातडीने वेळेचा विलंब न करता तो मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पोलिसांच्या अंदाजानुसार, संबंधित मृतदेह हा समुद्रात भरती आली असताना टाकण्यात आला असावा. त्यानंतर आता ओहटी असल्याने मृतदेहाची सुटकेस किनाऱ्यावर आली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटवणं अवघड आहे. पण पोलीस त्यांच्या स्तरावर या प्रकरणाचा उलगडा करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासासाठी स्वतंत्र 4 पथक तयार करण्यात आली आहेत.

याआधी दोन मृतदेह आढळले

एकाच महिन्यात तीन मृतदेह वसई पोलीस ठाणे हद्दीत सापडले आहेत. दोन मृतदेह हे वसई पाचूबंदर समुद्र किनाऱ्यावर तर आज एक मृतदेह भुईगाव समुद्र किनाऱ्यावर सापडला आहे. 15 जुलैला अनोळखी पुरुषाचा मृतदेह किल्लाबंदरला सापडला होता. त्याआधी 12 जुलैला ममता पटेल या बेपत्ता असणाऱ्या महिलेचा किल्ला बंदर येथे मृतदेह सापडला होता. ममता पटेल या मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या आणि त्या बेपत्ता झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला होता.

संबंधित बातम्या : 

अश्लील चित्रपट रॅकेटचे धागेदोरे थेट उत्तर प्रदेशपर्यंत, राज कुंद्राची कंपनी महिलेच्या बँक खात्यात कोट्यवधी पैसे का पाठवायची?

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, प्रचंड मारहाण, प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.