‘फ्लॅट खाली करण्यासाठी शारीरिक सुखाची वारंवार मागणी’, डोंबिवलीत भाजप नेत्यावर गंभीर आरोप

भाजप मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने नंदू जोशींवर फ्लॅट खाली करण्यासाठी शारीरिक सुखासाठी धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

'फ्लॅट खाली करण्यासाठी शारीरिक सुखाची वारंवार मागणी', डोंबिवलीत भाजप नेत्यावर गंभीर आरोप
भाजप मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर महिलेचे गंभीर आरोप केले आहेत. नंदू जोशी यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 11:32 PM

ठाणे : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात भाजप नेते आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात फ्लॅट खाली करण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी “पीडित महिला एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे. दोघांमध्ये वाद सुरु आहे. तो अधिकारी माझा मित्र असून पीडित महिला त्याला मदत करत असल्याचा संशय असल्याने तिने माझ्यावर आरोप केला आहे. माझा त्या महिलेशी कोणतेही संबंध नाही”, असं मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांनी सांगितलं आहे.

भाजप मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने नंदू जोशींवर फ्लॅट खाली करण्यासाठी शारीरिक सुखासाठी धमकी दिल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी भादवी ३५४ अ, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

‘माझा त्या महिलेशी कुठलाही संबंध नाही’

याबाबत मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांना विचारणा केली असता, “पीडित महिला एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे. दोघांमध्ये वाद सुरु आहे. तो अधिकारी माझा मित्र असून पीडित महिलेला त्याला मदत करत असल्याचा संशय असल्याने तिने माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी यापूर्वी कधीही त्या महिलेला पाहिलं नाही. तिला फोनही केला नाही. तिला कुठल्याही प्रकारचा एसएमएस केला नाही. पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करावी. माझा त्या महिलेशी कुठलाही संबंध नाही”, असं त्यांनी सांगितलं.

भाजपकडून मानपाडा पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा

या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केलाय. तर दुसरीकडे मानपाडा पोलिसांवरच गंभीर आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षातले कार्यकर्ते मानपाडा पोलीस ठाण्याच्या वर्तणुकीबाबत तक्रारी करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवली शहराध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांचं नाव कसं खराब आणि बदनाम होईल, असे कारस्थान मानपाडा पोलीस रचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या विरोधात उद्या सकाळी सकाळी 11 वाजता मानपाडा पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.