CCTV | धावत्या एक्सप्रेसमधून महिलेची पर्स हिसकावली, पोलिसांकडून फिल्मी स्टाईल पाठलाग, आरोपीला बेड्या
कल्याण-ठाणे या भागात रेल्वे, बस आणि रिक्षाने प्रवास करणं अवघड होत चालल्याचं दिसत आहे. कारण मोबाईल, पर्स चोरट्यांनी नागरिक आणि पोलिसांना नाकीनऊ आणून सोडलं आहे.
कल्याण : कल्याण-ठाणे या भागात रेल्वे, बस आणि रिक्षाने प्रवास करणं अवघड होत चालल्याचं दिसत आहे. कारण मोबाईल, पर्स चोरट्यांनी नागरिक आणि पोलिसांना नाकीनऊ आणून सोडलं आहे. दरम्यान धावत्या मेल एक्स्प्रेसमधून महिलेची पर्स हिसकावून पळणाऱ्या चोराला पाठलाग करून पोलिसांनी पकडलं आहे. बुधवारी जोधपूर एक्स्प्रेस मध्ये हा प्रकार घडला होता. (Womans purse snatched from running express, Kalyan police chase and handcuffed accused)
या प्रकरणी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. इमरान सिद्दीकी असं या चोराचं नाव आहे. त्याने चोरलेले पाच मोबाईल आणि दागिने पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले आहेत. कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या चोराला पकडण्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
व्हिडीओ पाहा
ठाण्यात मोबाईल चोरांचा सुळसुळाट, प्रवाशांवर जीवघेणे हल्ले
काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशनजवळ एका मोबाईल चोरामुळे डोंबिवलीच्या महिलेचा मृत्यू झाला. दुसरीकडे तीन दिवसांपूर्वी ठाण्याच्या तीन हात नाक्याजवळ चालत्या रिक्षातील महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणातही महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. या दोन्ही गोष्टी ताज्या असताना कल्याण रेल्वे स्टेशनवर पुन्हा तशीच काहीशी घटना घडली आहे. या घटनेत एक प्रवासी जखमी झाला आहे. मोबाईल चोरांच्या या सुळसुळाटमुळे प्रवाशांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे.
नेमकं काय घडल?
ठाण्यात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. कळवा रेल्वे स्थानकात मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्यासोबतच्या झटापटीत विद्या पाटील या महिला प्रवाशाचा जीव गेला. ही घटना ताजी असताना आता कल्याण रेल्वे स्थानकात अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एक प्रवासी ट्रेनच्या दारात उभा असताना चोरट्याने त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने चोरट्याचा प्रतिकार केला. चोरट्याने झटापटीत प्रवाशांच्या नाकावर जोरदार प्रहार केला. ट्रेन सुरु होताच चोरटा पळून गेला. या झटापटीत प्रवासी रक्तबंबाळ झाला.
संबंधित बातम्या
(Womans purse snatched from running express, Kalyan police chase and handcuffed accused)