Mumbai Crime : दाऊदच्या नावे धमकी देत लेखिकेवर बलात्कार, फाईव्हस्टार हॉटेलमधील प्रकार, मुंबई महिलांसाठी असुरक्षित?

मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये एका 75 वर्षीय व्यावसायिकाने 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार केला आहे.

Mumbai Crime : दाऊदच्या नावे धमकी देत लेखिकेवर बलात्कार, फाईव्हस्टार हॉटेलमधील प्रकार, मुंबई महिलांसाठी असुरक्षित?
बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 12:20 PM

मुंबई : मुंबईतील जुहूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या नावाची धमकी देत महिलावर बलात्कार (Mumbai Rape) केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला लेखिका आहे. एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये व्यावसायिकाने या लेखिकेसोबत अतिप्रसंग केला. शिवाय याबद्दल बाहेर कुठे बोलल्यास मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. या व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लेखिकेवर बलात्कार

मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये एका 75 वर्षीय व्यावसायिकाने 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार केला आहे. आरोपीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने बलात्कार पीडितेला धमकी दिली. अन् तिच्यावर बलात्कार केला. याबद्दल कुणालाही सांगितल्यास किंवा पोलिसात तक्रार केल्यास मी जीवे मारेन, अशी धमकीही दिली.

या व्यावसायिकाने पीडित महिलेकडून 2 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं.पण ते परत केले नाही. याबद्दल आपण तक्रा करू असं जेव्हा या महिलेने सांगितलं तेव्हा तिला दाऊदच्या नावाने धमक्या दिल्या जाऊ लागल्या. पीडितेला थेट धमकी देण्यात आली की, तिने याबाबत कोणाला काही सांगितले तर तिला मारून टाकण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

पोलिसात तक्रार

या प्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376(2) नुसार गुन्हा दाखल केला. आयपीसी एन504 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस महिलेच्या आरोपांची चौकशी करत आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.

मुंबई महिलांसाठी असुरक्षित?

मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत महिला, मुली सुरक्षित आहे का? असा सवाल विचारणं काळाची गरज बनत चालला आहे. यावर ठोस उपाय योजना होणं गरजेचं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.