माहिममध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु

तरुणाचा मृतदेह आढळलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तरुणाच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेने माहिम परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

माहिममध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
आर्थिक चणचणीतून विद्यार्थ्याची आत्महत्याImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 8:19 PM

मुंबई : माहिम परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. माहिम पोलिसांना 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तरुणावर नेमका हल्ला कोणी केला आहे हे अद्याप उघड होऊ शकलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे. तरुणाचा मृतदेह आढळलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तरुणाच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेने माहिम परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

माहीम परिसरात एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या जखमी तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.

धारदार शस्त्राच्या हल्ल्यामुळे तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. त्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आकाश संजय भालेराव असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो धारावी येथील रहिवासी आहे, अशी माहिती माहिम पोलिसांनी दिली आहे.

नेमके कारण अद्याप उघड नाही

तरुणावर हल्ला कोणी केला तसेच हल्ला करण्यामागील नेमके कारण काय असू शकेल, याचे धागेदोरे पोलिसांकडून शोधले जात आहे. घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.