मी सॅम डिसुझा नाही, माझ्या प्रोफाईचा चुकीचा वापर, पालघर पोलिसांत प्रभाकर साईलविरोधात तक्रार दाखल
मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी याचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी आर्यन खानच्या सुटके साठी मागितलेल्या 25 कोटीतील 18 लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता. तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हेनिक बाफना असून प्रभाकर साईल यांनी आपल्या प्रोफाईल फोटोचा दुरुपयोग केल्याची आणि या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

पालघर : मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी याचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी आर्यन खानच्या सुटके साठी मागितलेल्या 25 कोटीतील 18 लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता. तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हेनिक बाफना असून प्रभाकर साईल यांनी आपल्या प्रोफाईल फोटोचा दुरुपयोग केल्याची आणि या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
समीर वानखेडे आणि साक्षीदार असलेले किरण गोसावींवर गंभीर आरोप
मुंबईतील क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर एनसीबीने केलेली कारवाई सध्या देशभर गाजत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून या प्रकरणात एनसीबीचे साक्षीदार असलेले किरण गोसावी यांचे खाजगी बॉडीगार्ड असलेल्या प्रभाकर साईल यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि साक्षीदार असलेले किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एका वृत्त वाहिनीवर प्रभाकर साईल यांनी दिलेल्या माहिती दरम्यान क्रुझवरील कारवाईनंतर बाहेर आल्यावर किरण गोसावीला सॅम नामक व्यक्तीचा फोन आला. या संभाषणा दरम्यान 25 कोटीची मागणी करुन 18 कोटींवर फिक्स करुन त्यातील 8 समीर वानखेडेंना देऊ बाकी 10 आपण वाटून घेऊ, असे संभाषण गोसावी आणि सॅम दरम्यान झाल्याचा दावा प्रभाकरने केला होता.
याच सॅमने माझ्या मार्फत चर्चगेट जवळील एका हॉटेल जवळ 18 लाख रुपये घेतल्याची माहिती दिली. प्रभाकरने आपल्या मोबाईलमध्ये दाखवलेला सॅम नामक व्यक्तीचा फोटो हा पालघरमधील एक व्यापारी हेनिक बाफना यांचा असून, ‘मी प्रभाकर साईलला दोन महिन्यापूर्वी व्यवसाया निमित्त भेटलो होतो. मात्र, माझा त्याच्याशी कुठलाही व्यवहार झाला नसल्याबाबत तक्रार अर्ज पोलीस अधिक्षकांकडे दिला आहे. माझा प्रोफाईलवरील फोटो आणि माझ्या मोबाईल नंबरचा आधार घेत माझे सॅम नाव सांगून मला 18 लाख रुपये दिल्याची माहिती प्रसारित करुन प्रभाकर साईल माझी बदनामी करत आहेत’, असं बाफना यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
त्यांची बदनामी करणाऱ्या प्रभाकरवर कडक कारवाईची मागणी ही त्यांनी तक्रार अर्जात केली आहे. आरोपी किरण गोसावी हा पालघर जिल्ह्यातील मनोर येथील रहिवासी असून त्याने पालघरमध्ये अनेक वेळा फेऱ्या मारल्याची माहिती पुढे येत असून त्याचा अनेक लोकांशी व्यवहार झाल्याची चर्चा आहे.
Mumbai Drugs Case : ड्रग्स प्रकरणात दोन आरोपींना विशेष न्यायालयाकडून दिलासा, जामीन मिळालेले दोन आरोपी कोण? https://t.co/93ATCBMTSX @narcoticsbureau @MumbaiPolice @Dwalsepatil @nawabmalikncp #MumbaiDrugBust #AryanKhanCase #ManishRajgaria #AvinSahu #Bail #AryanKhanDrugCase
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2021
संबंधित बातम्या :