Mumbai Goa Express : मुंबई-गोवा महामार्गावरती भीषण अपघात, दहा जणांचा जागीचं मृत्यू, पाच वर्षाचा मुलगा बचावला
गुहागर तालुक्यातील हेदवी येथील काहींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील हेदवी परिसरातील काही नातेवाईक मंडळी रायगडच्या दिशेने निघाले आहेत.
रायगड – कोकणात मुंबई-गोवा (Mumbai-Goa expressway accident) महामार्गावरती झालेल्या रायगड (Raigad) जिल्ह्यातील रेपोली (Repoli) भागात ट्रक आणि कारचा पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये दहा जणांचा जागीचं मृत्यू झाला असल्याची माहिती समजली आहे. या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. भीषण अपघातामध्ये निलेश पंडित हा पाच वर्षाचा मुलगा दैव बलवत्तर म्हणून वाचला आहे.
गुहागर तालुक्यातील हेदवी येथील काहींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील हेदवी परिसरातील काही नातेवाईक मंडळी रायगडच्या दिशेने निघाले आहेत. गाडीतील सगळ्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात अडचण येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्यांच्याकडे असलेल्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड या कागदपत्रावरुन त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. अपघातातून बचावलेल्या छोट्या मुलाचे नावही असलेल्या आधार कार्ड वरून मिळाला आहे.