तक्रारदार महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं पडलं महागात, पोलीस गोत्यात, कोर्टाने थेट…
पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी असतात. जनजीवन सुरळीत चालावं, कायदा-सुव्यवस्था असावी हे पोलिसांचे कर्तव्य, पण त्याच पोलिसांमुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर ? अशा वेळेस काय करावं ?
पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी असतात. जनजीवन सुरळीत चालावं, कायदा-सुव्यवस्था असावी हे पोलिसांचे कर्तव्य, पण त्याच पोलिसांमुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर ? अशा वेळेस काय करावं ? अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रकरणात तक्रार नोंदवलेल्या महिलेला, चक्क पोलीसानेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठी खळबळ माजली असून संबधित पोलीस निरीक्षक चांगलाच गोत्यात आल्याचे समजते. याप्रकरणाची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली असून त्या पोलीसाविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याची खातेनिहाय चौकशी व्हावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पोलीस उपनिरीक्षक समता नगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. तेथेच एका महिलेने तक्रार नोंदवली होती. मात्र तिच्या तक्रारीचे निवारण करणं राहिल दूर, संबधित पोलीस उपनिरीक्षीकाने त्या महिलेला फेसबूक या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिलाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे समोर आले आहे. मात्र ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण आता त्याच्या पोलिसाच्या चांगलच अंगलट आलंय.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डा. नीला गोखले यांच्या खंडपीठाने त्या पोलिस उपनिरीक्षाची चौकशी करण्याचे आदेश डीसीपींना दिले आहेत. या पोलिसाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. एवढेच नव्हे तर पोलिसांचे कोणतेही असभ्य वर्तन खपवून घेणार नाही, असेही न्यायालयाने याप्रकरणात बजावले आहे.
मोकळा वेळ मिळतोच कसा ?
पोलीस उपनिरीक्षकावर पोलीस स्टेशनची महत्वाची जबाबदारी असते, त्यांच्यावर कामाच ताणही अधिक असतो. असे असतानाही पोलीस उपनिरीक्षकांना सोशल मीडिया वापरायला, ॲक्टिव्ह राहून अशी फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे पाठवायला वेळ मिळतोच कसा ? असा सवालही न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डा. नीला गोखले यांच्या खंडपीठाने यावेळी उपस्थित करत पोलिसांचे कान टोचले.