आठ वर्षे जुन्या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीला दिलासा, काय आहे नेमके प्रकरण

सरकारी पक्षाच्या आरोपानुसार हा कट केनिया येथील एका हॉटेलातील डायनिंग एरियात रचला गेला होता. तेथे ममता कुलकर्णी टेबल शेजारी बसल्या होत्या, हा सरकारी पक्षाचा पुरावा पुरेसा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आठ वर्षे जुन्या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीला दिलासा, काय आहे नेमके प्रकरण
mamta kulkarni
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 10:06 AM

बॉलिवूड गाजविणारी एकेकाळची अभिनेत्री ममता कुलकर्णी हीला आठ वर्षे जुन्या अंमलीपदार्थाच्या प्रकरणात कोर्टाने दिलासा दिला आहे. साल 2016 रोजी अंमलीपदार्थाच्या तस्करीत ममता कुलकर्णी अडकली होती. तिच्या विरोधीत खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अलिकडेच झालेल्या सुनावणीत तिला दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील 2000 कोटीच्या ड्रग्ज जप्ती प्रकरणात ममता कुलकर्णी हीच्या विरोधात दाखल एफआयआर रद्द केला होता.

ममता कुलकर्णी हिच्या विरोधात दाखल झाली केस संपूर्णपणे निराधार असून तिला त्रास देण्यासाठी ती दाखल करण्यात आलेली आहे असे कोर्टाने बजावत तिच्या विरोधातील तक्रार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ममता कुलकर्णी हिच्या विरोधात केस सुरु ठेवणे कोर्टाच्या प्रक्रियेचा दुरुपयोग ठरण्याहून कमी नसेल असे कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टाने रद्द केला FIR

ममता कुलकर्णी हिच्या विरोधात दाखल आरोपांना सरकारी पक्ष सिद्ध करु शकलेला नाही. हायकोर्टाने 22 जुलै रोजी कुलकर्णी हीच्या विरोधातील केस रद्द करुन टाकली. बुधवारी 7 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा विस्तृत निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला.  आरोपपत्रात साक्षीदारांच्या जबानी आणि अन्य पुरावे पाहाता, हा कट केनिया येथील एका हॉटेलातील डायनिंग एरियात रचला गेला होता. जेथे कुलकर्णी डायनिंग टेबलजवळ बसली होती. या सर्व पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर हायकोर्ट म्हणाले उपलब्ध पुरावे एनडीपीएस एक्टनूसार ममता कुलकर्णी हिच्या विरोधातील आरोप कायम ठेवण्यास पुरेसे नाहीत. एनडीपीएस एक्ट आणि विशेषकरुन कलम 8 ( सी ) आणि सह कलम 9 (ए) अनुसार सर्व प्रकरणात त्याच्या विरोधात दाखल आरोप कायम ठेवण्यास हे सर्व पुरावे अपुरे आहेत असेही कोर्टाने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे हे प्रकरण

12 एप्रिल, 2016 रोजी ठाणे पोलिसांनी दोन वाहनांमधून जाणाऱ्या लोकांच्या झडतीत 2-3 किलोग्राम इफेड्रिन पावडर जप्त केली होती. नार्कोटिक्स अधिनियमनूसार ते प्रबंधित द्रव्य असून या वाहनाचा चालक मयूर आणि सागर यांना ताब्यात घेतले होते. 80 लाखांहून अधिक किंमतीचे हे ड्रग्स औषध निर्मिती करणाऱ्या एका बोगस कंपनीच्या नावे चालले होते. या प्रकरणाच्या चौकशीत अभिनेत्री ममता कुलकर्णी सोबत दहा अन्य लोकांवर गुन्हा दाखल झाला होता. परंतू आता त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.