लोकलमध्ये मंत्रालय कर्मचाऱ्यावर महिलेसह चौघांचा हल्ला, प्रवाशानेच बहादुरीने एकाला पकडले

(Mumbai Local Passenger attacked )

लोकलमध्ये मंत्रालय कर्मचाऱ्यावर महिलेसह चौघांचा हल्ला, प्रवाशानेच बहादुरीने एकाला पकडले
Vijay Waghdhare
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:57 AM

मुंबई : मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भरदिवसा सव्वा दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चोरीच्या उद्देशाने महिलेसह चौघांनी प्रवाशावर हल्ला केला होता. यापैकी एकाला प्रवाशानेच धरुन ठेवले, तर इतर तिघे पसार झाले आहेत. (Mumbai Local Passenger attacked while going to CSMT)

धीम्या लोकलमध्ये प्रवाशावर हल्ला

53 वर्षीय प्रवासी विजय वाघधरे यांच्यावर हा हल्ला झाला. वाघधरे हे मंत्रालयात एका विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून काम करतात. ते नेहमीप्रमाणे सकाळी मंत्रालयात जाण्यासाठी निघाले. वाघधरे यांनी मध्य रेल्वेवरील करी रोड रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी धीमी लोकल पकडली होती.

पाकिट आणि सोन्याची चेन मागितली

लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्नवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये विशेष गर्दी नव्हती. त्याच डब्यात बसलेल्या एका प्रवाशाने वाघधरेंना आधी जवळ येऊन वेळ विचारली. त्यानंतर मश्जिद बंदर रेल्वे स्टेशन गेल्यानंतर चौघांनी वाघधरेंकडे पाकिट आणि गळ्यातील सोन्याची चेन मागितली. त्यांनी प्रतिकार करताच चौघांनी मारहाण सुरु केली.

वाघधरेंनीच एका चोराला पकडले

वाघधरेंनी आरडाओरड सुरु केली. तेव्हा छशिमटकडे जाणाऱ्या इतर लोकलमधील प्रवाशांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. परंतु त्यांनाही मदत करणं शक्य झालं नाही. अखेर लोकल स्टेशनला पोहोचली. त्यावेळी तिघा जणांनी धावत्या लोकलमधून उड्या टाकत पोबारा केला. परंतु वाघधरेंनी बहादूरी दाखवत एका चोराला पकडण्याची कामगिरीही बजावली.

बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एका महिलेसह आणखी दोन आरोपींचा शोध सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडून घेतला जात आहे. तर आरोपी आसिफ शेख याला अटक करण्यात आली.

प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

चोरीच्या उद्देशाने चार जणांनी प्रवासी विजय वाघधरे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. मात्र सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लॉकडाऊनमुळे केवळ मोजकेच प्रवासी आहेत, परंतु दिवसाढवळ्या लोकलमध्ये प्रवासी सुरक्षित नाहीत का, चोरटे लोकलमध्ये कसे घुसले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू

(Mumbai Local Passenger attacked while going to CSMT)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.