Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Police : एटीएम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून देण्याच्या नावाखाली फसवणूक, गुन्ह्याची उकल झाल्यानंतर पोलिस सुध्दा…

त्यानंतर काळ्या-पिवळ्या टॅक्सीत महिलेला सोबत घेऊन काही अंतर गेल्यावर आणखी एक गुंडही त्या टॅक्सीत घुसला आणि दोघांनी मिळून महिलेला एटीएम सेंटरमध्ये नेले. तिथे एटीएम कार्ड अॅक्टिव्ह केले आणि महिलेला दुसरा डमी पाठवला.

Mumbai Police : एटीएम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून देण्याच्या नावाखाली फसवणूक, गुन्ह्याची उकल झाल्यानंतर पोलिस सुध्दा...
malad policeImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 8:12 AM

मुंबई : ज्येष्ठ महिला शिक्षिकेला (Retired Teacher) तिचे एटीएम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट (ATM Card Activation) करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करून तिच्या खात्यातून लाखो रुपये काढणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी (Malad Police) ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे दोघेही आरोपी आरोपी बँकेत ग्राहक म्हणून उभे राहतात, संधी पाहून ते ज्येष्ठ नागरिकाला मदतीच्या नावाखाली दुसऱ्या एटीएम केंद्रात घेऊन जातात त्यांची फसवणूक करून पळून जातात अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे. त्याचबरोबर मालाड व्यतिरिक्त इतर अनेक पोलिस ठाण्यांमध्ये आरोपींविरुद्ध 5 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. फसवणूक केलेल्या पैशातून दोघेही पब आणि लॉजमध्ये जाऊन मजा करायचे करायचे.

सद्या सेवानिवृत्त महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत. मालाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नवीन एटीएम कार्ड मागवले होते.नवीन एटीएम कार्ड घेऊन महिला बँकेत गेली. बँक कर्मचाऱ्यांना एटीएम कार्ड सक्रिय करण्यास सांगितले. बँकेचे कर्मचारी एटीएम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करत असताना, याचदरम्यान 1 आरोपी ग्राहक म्हणून बँकेच्या एटीएम मशीनजवळ उभा राहून महिलेच्या एटीएम कार्डचा पिन बघत होता. काही वेळाने एटीएम अॅक्टिव्हेट होत नसताना त्या गुंडाने महिलेला सांगितले की, दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन लगेच कार्ड अॅक्टिव्हेट करुया.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर काळ्या-पिवळ्या टॅक्सीत महिलेला सोबत घेऊन काही अंतर गेल्यावर आणखी एक गुंडही त्या टॅक्सीत घुसला आणि दोघांनी मिळून महिलेला एटीएम सेंटरमध्ये नेले. तिथे एटीएम कार्ड अॅक्टिव्ह केले आणि महिलेला दुसरा डमी पाठवला. कार्ड आणि महिलेच्या खात्यातून मूळ अ‍ॅक्टिव्हेटेड एटीएम कार्डने ४० हजार रुपये काढून लगेचच तो फरार झाला. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 5 वेगवेगळ्या बँकांचे डमी एटीएम कार्ड, 2 मोबाईल फोन, 15 हजारांची रोकड जप्त केली आहे.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.