Sunny Leone | सनी लिओनीच्या कार नंबरचा दुरुपयोग, मुंबईत तरुणाविरोधात गुन्हा
सनी लिओनीच्या गाडीच्या नंबरचा गैरवापर करुन मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. (Sunny Leone Car Number)
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या (Sunny Leone) कारच्या नंबरचा दुरुपयोग केल्याबद्दल मुंबईत तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनीच्या कारचा नंबर वापरुन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. (Mumbai Man booked for allegedly breaking traffic rules misusing Sunny Leone Car Number)
नेमकं काय घडलं?
सनी लिओनीच्या गाडीच्या नंबरचा गैरवापर करुन मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. MH 05 CT 1010 या अभिनेत्री सनी लिओनीच्या कार नंबरचा गैरवापर करुन एका वाहनचालकाने 2020 पासून वाहतूक नियमांचे मुंबईत उल्लंघन केले.
सनीच्या वाहनचालकाची पोलिसात तक्रार
सनी लिओनीचा ड्रायव्हर अकबर खान याने दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली. वरळी वाहतूक पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मुंबईतील अंधेरी भागात कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलसमोर या गाडीला ट्रेस करण्यात आलं. फसवणूक प्रकरणी पियुष रामेश्वर सेन याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केरळमधील आयोजकांची सनीविरोधात तक्रार
लाखो रुपयांचा अॅडव्हान्स घेऊनही केरळातील कार्यक्रमाला दांडी मारल्याने अभिनेत्री सनी लिओनी काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. त्यानंतर आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत सनीने आयोजकांचे दावे फेटाळले होते. संबंधित करारानुसार वेळेत पेमेंट मिळाले नसल्याचा दावा सनीने केला होता. केरळ पोलिसांनी तिरुअनंतपुरममधील एका खासगी रिसॉर्टमध्ये सनीची चौकशी केली होती. (Mumbai Man booked for allegedly breaking traffic rules misusing Sunny Leone Car Number)
काय आहे प्रकरण?
केरळमध्ये विविध उद्घाटन समारंभांना हजेरी लावण्याचं आश्वासन देत अभिनेत्री सनी लिओनीने 29 लाख रुपये घेतले, मात्र कार्यक्रमांना हजेरी लावली नाही, अशी तक्रार इव्हेंट मॅनेजर आर शियास यांनी दाखल केली होती. 2019 मधील कार्यक्रमासाठी हे मानधन घेतलं गेल्याची माहिती आहे. मात्र इव्हेंट मॅनेजरने चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप सनीने केला.
“चिखलफेक करणारे आरोप धक्कादायक”
“वेळ दिल्यानंतर मी एखाद्या इव्हेंटला जाणार नाही, असं शक्यच नाही. वेळेत पेमेंट न केल्यामुळे मी माघार घेतली. पूवरमध्ये मी इतर कार्यक्रम ठरवले होते. आम्ही घड्याळाच्या काट्यावर शूटिंग करत होतो. कोरोना काळात आम्ही आमचा जीव धोक्यात घातला होता. मनोरंजन विश्व रुळावर यावं, इतकीच आमची इच्छा होती. मात्र इव्हेंट समन्वयकांचे असे चिखलफेक करणारे आरोप आणि वर्तन धक्कादायक आहे” अशी प्रतिक्रिया सनीने दिली होती.
संबंधित बातम्या :
लाखोंचा अॅडव्हान्स घेऊन इव्हेंटला दांडी, सनी लिओनी म्हणते चिखलफेक थांबवा
लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन सनी लिओनीची कार्यक्रमाला दांडी
(Mumbai Man booked for allegedly breaking traffic rules misusing Sunny Leone Car Number)