प्रियकराने पेट्रोल ओतून पेटवलं, प्रेयसीने मिठी मारली, मुंबईत तरुणाचा होरपळून मृत्यू

मयत तरुण आणि प्रेयसी या दोघांचे जवळपास अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघांमध्ये काही काळापासून खटके उडत होते. (Mumbai Man Dies Girlfriend)

प्रियकराने पेट्रोल ओतून पेटवलं, प्रेयसीने मिठी मारली, मुंबईत तरुणाचा होरपळून मृत्यू
प्रातनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 12:18 PM

मुंबई : प्रेयसीला जिवंत जाळण्यासाठी गेलेल्या प्रियकराचाच आगीत भाजून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरी भागात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत गंभीर जखमी झालेली प्रेयसी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. (Mumbai Man Dies after Girlfriend set ablaze on fire)

जोगेश्वरी पूर्व मेघवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली. मयत तरुण आणि प्रेयसी या दोघांचे जवळपास अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघांमध्ये काही काळापासून खटके उडत होते.

मद्यपानानंतर छळ, प्रेयसीकडून लग्नास नकार

दारुच्या सवयीमुळे विजय वारंवार तरुणीचा छळ करत होता. कंटाळून प्रेयसीने विजयशी प्रेमसंबंध ठेवण्यास आणि त्याच्याशी लग्न करण्यासही नकार दिला होता. त्यामुळे संतापाच्या भरात विजयने टोकाचे पाऊल उचलल्याचं दिसत आहे.

प्रेयसीला जिवंत जाळण्यासाठी विजय पेट्रोल घेऊन गेला. मेघवाडी परिसरात त्याने तिच्यावर पेट्रोलही टाकले. मात्र तिने त्याला मिठी मारली. त्यामुळे तरुणीसोबत विजयही पेटला. अखेर आगीत होरपळून विजयचा मृत्यू झाला. तर प्रेयसी मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झगडत आहे.

नाशिकमध्ये लॉजवर बोलवून प्रेयसीची हत्या, प्रियकराला बेड्या

नाशिकमधील लॉजवर बोलवून प्रियकराने तरुणीची हत्या केल्याचा प्रकार गेल्या महिन्यात समोर आला होता. प्रेयसी अन्य तरुणाच्या संपर्कात असल्याच्या प्रियकर तन्मय धानवाला संशय होता. या संशयातूनच त्याने आपल्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली होती. (Mumbai Man Dies after Girlfriend set ablaze on fire)

नाशिकच्या सीबीएस चौकातील सिटी पॅलेस हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. संबंधित तरुणीचा हॉटेलमधील रुममध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर ही  हत्या आहे की आत्महत्या, असा प्रश्न उपस्थित झाला होता. पोलिसांनी अधिक तपास करुन प्रियकराला ताब्यात घेतलं होतं.

पालघरमध्ये प्रेयसीला भिंतीत गाडलं

प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिची हत्या करुन मृतदेह भिंतीत पुरल्याची धक्कादायक घटना पालघरमधील वाणगाव येथे घडली. 4 महिन्यांपूर्वी संबंधित तरुणी आणि आरोपी घरातून पळून गेले होते. मात्र, या काळात प्रियकराने तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह वाणगावमध्ये एका फ्लॅटच्या भिंतीत पुरल्याचे समोर आले आहे. प्रियकराने ही हत्या केल्याचे कबूल केले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे

संबंधित बातम्या :

लॉजवर बोलवून प्रेयसीची गळा दाबून हत्या, नाशिकमध्ये प्रियकराला बेड्या

खुर्चीत बसून शारीरिक संबंधात तरुणाला गळफास, अटकेतील तरुणी प्रेयसी नव्हे, पत्नी?

(Mumbai Man Dies after Girlfriend set ablaze on fire)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.