मुलुंड भागात गोळीबाराच्या घटनेनं खळबळ! अमर नगर परिसरातली घटना, पोलिस आणि आरोपीमध्ये झटापट

मुलुंडच्या अमर नगर परिसरात गोळीबाराची घटना आहे. आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांची आरोपीसोबत झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुलुंड भागात गोळीबाराच्या घटनेनं खळबळ! अमर नगर परिसरातली घटना, पोलिस आणि आरोपीमध्ये झटापट
गोळीबाराच्या घटनेनं खळबळ
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 11:15 PM

मुंबई : मुंबईच्या मुलुंड परिसरात गोळीबाराच्या (Firing in Mulund) घटनेनं खळबळ उडाली. मुलुंडच्या अमर नगर (Amar Nagar, Mulund) परिसरात गोळीबाराची घटना घडली. आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांची आरोपीसोबत झटापट झाल्याची माहिती समोर आली होती. मीरा भाईंदर गुन्हे शाखेची (Mira Bhayandar Crime Branch) टीम मुलुंड परिसरात आरोपीच्या शोधात आली होती. यावेळी आरोपीला पकडताना झटापट झाली.  दरम्यान, या गोळीबारात जीवितहानी झाली नाही. तसंच कुणाला जखम झाली नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. फरार आरोपींनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता. सुपारीने भरलेल्या ट्रकवर दरोडा टाकणाऱ्या आरोपीना पकडताना पोलीस आणि आरोपींमध्ये झटापट झाली. मुलुंडमध्ये लपलेल्या आरोपीना पकडताना झालेल्या झटापटीत पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. मुलुंड कॉलनी परिसरातील मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. मीरा भाईदर गुन्हे शाखेची कारवाई सुरु असताना हा प्रकार घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.

नेमकं काय घडलं?

18 फेब्रुवारीला अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुपरीने भरलेल्या ट्रकवर दरोडा टाकून 6 आरोपींनी 74 लाख 94 हजार रुपयांच्या सुपारीसह ट्रक पळवला होता. यातील एका आरोपीला मीरा भाईदर पोलिसांनी विरार फाटा परिसरात ट्रक थांबवून ताब्यात घेतले होते. उर्वरित आरोपी मुलुंड कॉलनी परिसरात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाईला सुरुवात केली होती.

हवेत एक राऊंड फायर

त्यानुसार मुलुंड परिसरात भाईनंदर पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम मंगळवारी पोहोचली आणि आरोपीना ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी आरोपीकडून प्रतिकार सुरू झाला आणि आरोपीनी पोलिसांवर हल्ला करायला सुरुवात केली. प्रत्युत्तराखातर पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. यावेळी झालेल्या झटापटीत एका अधिकाऱ्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून एक राउंड हवेत फायर झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अजूनही दोघे फरार

पोलिसांनी या सर्व आरोपीना मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले असून त्यांना आता अटक करण्यात आलीय. आरोपींनी पळवलेला सुपारीचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. जयविर रामस्वरूप, सिद्धार्थ जन्मजेय, कौशिर खान, अत्तार खान या आरोपीना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. तर दोन आरोपी अद्याप फरार असूनही त्यांच्या पोलिस मागावर आहेत. मीरा भाईदर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त महेश पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाईत मुलुंड पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

चिखलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, व्हिडीओ व्हायरल

नवी मुंबईतील इस्कॉन मंदिरातील चोरी प्रकरणी बांग्लादेशी घुसखोरांना अटक, 80 हजार रोख रक्कम व इतर मुद्देमाल हस्तगत

पालघरमध्ये आदिवासी महिलेवर बलात्कार, आरोपी अद्याप मोकाट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.