Mumbai Crime : अवघी एक पानी नोट ठेवून तिने 14 व्या मजल्यावरून… तरूणीच्या धक्कादायक कृत्यामुळे मुंबईत खळबळ
युष्य एकदाच मिळतं, ते अनमोल आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, पण काहींना त्याची जाणीव नसते. त्यामुळे भावनेच्या भरात काहीजण असं पाऊल उचलतात, ज्यामुळे सगळचं विस्कटतं. एका क्षणात आयुष्य संपतं. नववर्ष सुरू होऊ अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच मुंबईतून अशी एक धक्कादायक बातमी समोर आली.

मुंबई | 4 जानेवारी 2024 : नववर्ष हे नवीन आशा, उत्साह घेऊन येतं. जुन्या आयुष्यातल्या, वर्षातल्या चुका मागे ठेवून आपण एक नवी सुरूवात करतो. आयुष्य एकदाच मिळतं, ते अनमोल आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, पण काहींना त्याची जाणीव नसते. त्यामुळे भावनेच्या भरात काहीजण असं पाऊल उचलतात, ज्यामुळे सगळचं विस्कटतं. एका क्षणात आयुष्य संपतं. नववर्ष सुरू होऊ अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच मुंबईतून अशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे अवघ्या 19 वर्षांच्या तरूणीने टोकाचं पाऊल उचललं.
मुंबईत राहणाऱ्या या 19 वर्षांच्या मुलीने ती रहात असलेल्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली. विद्या असे मृत तरूणीचे नाव असून ती गेल्या काही वर्षांपासून या इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये पेईंग गेस्ट म्हणून रहात होती. याप्रकरणी डीएन नगर पोलिस अधिक तपास कपत आहेत.
एक पानी नोट मागे ठेवून उचललं टोकाचं पाऊल
डीएन नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधी ही 19 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. मुंबईतील एका इमारतीत ती गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यास होती. मात्र गेल्या काही दिवसांपासूनच ती कोणत्या तरी कारणामुळे काळजीत होती. त्याच भरात तिने हे पाऊल उचलले. बुधवारी तिने राहत्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावर जाऊन तेथून खाली उडी मारली. एका क्षणात तिने आयुष्य संपवलं. मात्र त्या पूर्वी तिने एक पानी नोट मागे ठेवली.
बुधवारी इमारतीच्या चौकीदाराने जमिनीवर एका तरूणीचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून सोसायटीच्या सदस्यांना या घटनेची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच डीएन नगर पोलीस स्टेशनमधील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच तिने मागे ठेवलेली नोटही ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे.