Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : रस्त्यावरची ती एक चूक त्याला चांगलीच महागात पडली, हजारोंचा बसला फटका

दक्षिण मुंबईतील एलटी मार्ग पोलिसांनी मुंबई पोलीस अधिकारी म्हणून भासवून पैसे उकळणाऱ्या दोन तोतयांना अटक केली. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Mumbai Crime : रस्त्यावरची ती एक चूक त्याला चांगलीच महागात पडली, हजारोंचा बसला फटका
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 10:23 AM

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : स्मोकिंग करणं (smoking) हे आरोग्यासाठी आणि इतरांसाठीही धोकादायक आहे. हे सर्वांनाच माहीत असतं पण तरीही बरेच लोक सिगारेट ओढतात. मात्र त्यामुळे आरोग्याचे नुकसान होते, इतरांनाही त्रास होतो. त्यामुळे अनेक सार्वजनिक ठिकाणी सिगारेट स्मोकिंगवर बंदी लावण्यात आली आहे. मात्र ही बंदी झुगारून सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करणं एका इसमाला चांगलचं महागात पडलं आहे. हा इसम रस्त्यावर उभं राहून सिगारेट ओढत होता. मात्र तीच चूक त्याला महागात पडली आणि मेहनतीची कमाई (fraud) गमवावी लागली.

रस्त्यावर उभ राहून सिगारेट ओत असताना पोलिसांनी त्याला टोकलं आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याबद्दल, कायदा मोडल्याबद्दल त्याला दंड ठोठावला. कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्याने दंडाची रक्कम तर भरली. पण ते पोलिस (fake police) त्याला पावती न देताच निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.

नेमक काय झालं ?

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. फिर्यादी जितेंद्र जैन (वय 28) हा त्या दिवशी शामलदास गांधी मार्गावर थांबला होता. तेथे उभा राहून तो सिगारेट ओढत होता. मात्र तेवढ्यात मोटरसायकलवरू दोन इसम तिकडे आले आणि या भागात धूम्रपान करण्यावर बंदी असल्याचे त्यांनी जितेंद्र याला सांगितले. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्या दोघांनी जैन याच्याकडून दोन हजार रुपयांची (दंड) मागणी केली. जितेंद्रने त्यांना दंडाची रक्कम दिली. मात्र त्या अधिकाऱ्यांनी त्याला दंडाच्या रकमेची पावती काही दिली नाही आणि लगेचच तेथून फरार झाले.

जितेंद्रने काळबादेवी विभागातील वाहतूक पोलीस अधिकारी सुरेश जाधव यांना हा प्रकार सांगताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. ज्यानंतर दोन्ही संशयितांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. तांत्रिक तपासानंतर आणि विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी कारवाई करत सुजित शिंदे (37) आणि मनोज परब (30) या दोन्ही आरोपींना अटक केली. परब याच्याविरोधात यापूर्वीही बोरिवली येथे गुन्हा दाखल होता. पुढील तपास सुरू आहे,असे एलटी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय ज्ञानेश्वर वाघ यांनी सांगितले.

ही घटना घडली तेव्हा पोलिस असल्याची बतावणी करणारे दोघेही आरोपी साध्या कपड्यात होते, त्यांनी युनिफॉर्म परिधान केलेला नव्हता, असेही पोलिसांनी नमूद केले. आरोपी शिंदे हा चुनाभट्टी येथे तर परब हा बोरिवली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांवर कलम 170, 420 (फसवणूक) आणि आयपीसीच्या इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.