Mumbai news : कामावरुन आला अन् गच्चीवर गेला, कुणाला काही कळायच्या आत तरुणाने…

कामावरुन घरी आला आणि थेट गच्ची गाठली. मग तरुणाने पुढे जे घडलं त्याने एकच खळबळ उडाली.

Mumbai news : कामावरुन आला अन् गच्चीवर गेला, कुणाला काही कळायच्या आत तरुणाने...
वहिनीने प्रियकराच्या मदतीने दिराला संपवले
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 4:29 PM

मुंबई : मुलीनेच आईची हत्या केल्याची घटना अजून ताजी असतानाच लालबागमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. एका 24 वर्षीय तरुणाने 13 मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर तरुण डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचारही सुरु होते. ध्रुव शाह असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. तरुणाचा मृतदेह केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणाचा मोबाईल आणि लॅपटॉप तांत्रिक तपासासाठी जप्त केला असल्याचे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद भोवटे यांनी सांगितले.

कामावरुन आला, गच्चीवर गेला अन्…

लालबागमध्ये 13 मजली हायप्रोफाईल इमारतीत राहणारा ध्रुव सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे 5.15 वाजण्याच्या सुमारास कामावरुन घरी आला. त्यानंतर तो थेट इमारतीच्या गच्चीवर गेला. त्यावेळी गच्चीवर वॉटरप्रूफिंगचे काम सुरु होते. तेथे काम करत असलेल्या कामगारांच्या काही लक्षात येण्याआधीच ध्रुवने गच्चीवर उडी घेतली.

तरुणाला तात्काळ केईएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुण नैराश्येत होता. त्याबाबत त्याच्यावर उपचारही सुरु होते. तरुणाला नेमकं कोणत्या कारणातून नैराश्य आलं होतं हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तपासाअंती सर्व समोर येईल.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.