धक्कादायक ! एनआयसीयू युनिटमध्ये बाळ रडल्यामुळे तोंडाला लावली चिकटपट्टी

एक महिलेची भांडुपच्या सावित्रीबाई रुग्णालयात प्रसुती झाली होती. बाळाला काही कारणास्तव एनआयसीयू युनिटमध्ये ठेवण्यात आले होते. आई बाळाला पाहण्यासाठी एनआयसीयूमध्ये गेली असता समोरील दृश्य पाहून तिला धक्काच बसला.

धक्कादायक ! एनआयसीयू युनिटमध्ये बाळ रडल्यामुळे तोंडाला लावली चिकटपट्टी
भांडुपमधील सावित्रीबाई फुले रुग्णालयात धक्कादायक प्रकारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 5:33 PM

मुंबई : भांडुपमधील मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुती गृहामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान मुले रडू नयेत म्हणून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याचे घृणास्पद काम रुग्णालयातील परिचारिकांकडून केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील एनआयसीयु युनिटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बालकाच्या मातेने भाजपत्या माजी नगरसेविका जागृती पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. यानंतर जागृती पाटील यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत प्रकरणाचा जाब विचारला. रुग्णालया प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

आई बाळाला पहायला गेली तर बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी होती

सावित्रीबाई फुले रुग्णालयात काही दिवसांपूर्वी प्रिया कांबळे यांची प्रसुती झाली होती. बाळाला कावीळ झाली असल्यामुळे त्याला एनआयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं. बाळाला पाहण्यासाठी जेव्हा प्रिया या एनआयसी युनिटमध्ये आल्या. त्यावेळी त्यांच्या बाळाच्या तोंडामध्ये चोखणी देऊन त्याचं तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आलं होतं. यासंदर्भात त्यांनी तिथल्या परिचारिकांना विचारलं असता बाळ रडत असल्यामुळे बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावली जात असल्याचा खुलासा केला.

एका परिचारिकेचे निलंबन, एकीला नोटीस

बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याप्रकरणी एनआयसी युनिटमध्ये कार्यरत असलेल्या सविता भोईर या परिचारिकेला निलंबित केलं आहे. तसेच एका परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे याच सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहामध्ये एनआयसीयु युनिटमध्ये ठेवण्यात आलेली नवजात मुले दगावल्याची घटना समोर आली होती. परंतु तरी देखील रुग्णालय प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे दिसते.

हे सुद्धा वाचा

'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....