प्रियकराकडून प्रेयसीवर अत्याचार, मग श्रद्धा वालकरसारखी हत्येची धमकी दिली, मायानगरीत चाललंय काय?

त्या दोघांची काही निमित्ताने बेट झाली. मग भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत होते. मग त्याचे बदललेले रुप पाहून तिला धक्काच बसला.

प्रियकराकडून प्रेयसीवर अत्याचार, मग श्रद्धा वालकरसारखी हत्येची धमकी दिली, मायानगरीत चाललंय काय?
वरळी सी-फेसवर तरुणीचा मृतदेह आढळलाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 1:57 PM

मुंबई : मुलीशी ओळख निर्माण करत मग तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच आपलं म्हणणं न ऐकल्यास श्रद्धा वालकर प्रमाणे तुझीही हत्या करेन अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली. अखेर तरुणीने हिंमत करुन मुलुंड पोलिसात धाव घेत सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 376 (1) (बलात्कार), 376(2) (एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे), 354 (डी) (दांडा मारणे), 506 (गुन्हेगारी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुख्तार अहमद अली सय्यद असे आरोपीचे नाव आहे.

ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले अन्…

तरुणीचा हवाला देत मुलुंड पोलिसांनी सांगितले की, आरोपी मुख्तार अहमद अली सय्यद हा भांडुप येथील रहिवासी असून, त्याची 2020 मध्ये पीडितेशी ओळख झाली. यानंतर फोन आणि मेसेजद्वारे दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर आरोपीने तरुणीला प्रपोज केले. तरुणीने होकार दिल्यानंतर आरोपी तिला वर्सोवा आणि पवईला फिरायला नेले.

धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार

यानंतर सय्यदने एकदा तिला भेटण्याच्या बहाण्याने कांजूरमार्ग येथील सनशाईन लॉजवर बोलावले. तिथे त्याने तरुणीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या वडिलांना याबाबत माहिती देण्याची धमकी देऊन अनेक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सततच्या छळाला कंटाळून पीडितेने त्याच्या कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देणे बंद केले.

हे सुद्धा वाचा

आपल्याला प्रतिसाध देत नाही पाहून 2 जून रोजी सय्यदने तिला धमकी दिली. जर तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर तिची श्रद्धा वालकरसारखीच अवस्था करेन अशी धमकी त्याने दिली. यानंतर तरुणीने हिंमत दाखवत शुक्रवारी पोलिसांकडे धाव घेतली. तरुणीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सय्यदविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.