Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : सात महिन्यांच्या अथक तपासानंतर सायबर फ्रॉडच्या मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

बजाज फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून ऑनलाइन पॉलिसी आणि कर्जाच्या ऑफरच्या नावाखाली त्याने तक्रारदाराची फसवणूक केली.याप्रकरणी पोलिसात दाखल करण्यात आली होती.

Mumbai Crime : सात महिन्यांच्या अथक तपासानंतर सायबर फ्रॉडच्या मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 10:53 AM

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : सामान्य, निष्पाप नागरिकांशी गोड बोलून त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांची संख्या वाढली आहे. अशीच एका सायबर फ्रॉडची घटना उघडकीस आली होती. त्याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. सतत सात महिने पाठपुरावा केल्यानंतर सायबर फ्रॉड (cyber fraud) प्रकरणातील संशयिताला अटक केली आहे. या काळात आरोपी फरार होता.

एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या आणि अंधेरी पश्चिम येथे राहणाऱ्या २९ वर्षीय पीडित इसमाची आरोपींने ६०,००० रुपयांची फसवणूक केली होती. आपण बजाज फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत आरोपीने ऑनलाइन पॉलिसी आणि कर्जाच्या ऑफरच्या नावाखाली तक्रारदाराची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. किरण माने (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र, त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

खोटा दावा करून केली फसवणूक

फेब्रुवारी 2023 मध्ये , पीडित इसमाला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. आपण बजाज फायनान्स कंपनीचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा खोटा दावा कॉलरने केला. खोटं बोलणाऱ्या त्या तोतयाने पीडित इसमाला कर्जाची ऑफर दिली आणि काही इन्श्युरन्स पॉलिसींची शिफारसही केली. पॉलिसी मिळाल्यास कर्ज मंजूरीची हमी मिळेल, असे आश्वसन पीडित इसमाला देण्यात आले. त्यानंतर त्याला एका विशिष्ट बँक खात्यात निधी ट्रान्स्फर करण्याची सूचनाही देण्यात आली. पीडित इसमाने या सूचनांचे पालन करत पैसे पाठवले.

मात्र काही दिवसांनी त्या कॉलरने पीडत इसमाला पुन्हा फोन केला आणि तुमची आई सीनिअर कॅटॅगरीत येत असल्याने अतिरिक्त पॉलिसी खरेदी करावे लागेल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडित इसमाने 60 हजार रुपये त्याला ट्रान्स्फर केले.

कर्जाच्या रकमेबाबत जे वचन दिले होते, त्याबद्दल शंका निर्मा झाल्यानंतर पीडित इसमाने त्या कॉलरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने टाळाटाळ करत असंबंद्ध उत्तरे देण्यास सुरूवात केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे पीडित इसमाच्या लक्षात आले आणि त्याने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर अंधेरी पोलिसांकडून सतत सात महिने गुन्हेगाराचा शोध घेण्यात आला. अखेरट त्याला अटक करण्यात यश मिळाले. पण दुसरा साथीदार अद्यापही फरार आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.